Mira Road Spa Sex Racket : “स्पा”च्या आड नरकयात्रा! – सेक्स रॅकेटवर धाड, चार मुलींची सुटका

•Viva Spa मध्ये ‘लक्झरी मसाज’च्या नावाखाली शरीरविक्रयाचा घिनौणा खेळ!
मिरारोड | मसाज पार्लरच्या आड मुलींचा सौदा करणाऱ्या ‘रॉयल द लक्झरी (Viva) स्पा’वर मिरा-भाईंदर पोलिसांच्या विशेष पथकाने थरारक धाड टाकून चार पीडित मुलींची सुटका केली. Mira Road Spa Sex Racket सौंदर्य उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या या ‘वास्तविक नरकयात्रे’चा पर्दाफाश पोलिसांच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे उघडकीस आला.
विशेष माहितीवरून 17 जुलै रोजी संध्याकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि नंतर स्पावर छापा टाकला. या छाप्यात ‘डील’ ठरवून सेक्ससाठी जागा पुरवणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. Mira Road Spa Sex Racket
या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 45,380 रुपये रोख रक्कम आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. Mira Road Spa Sex Racket
प्राप्त माहितीनुसार, या स्पामध्ये 7,500 रुपयांच्या मोबदल्यात ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 17 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास बनावट ग्राहक आणि पंचांसह सापळा रचून छापा टाकण्यात आला. Mira Road Spa Sex Racket
अटक आरोपी
गोविंद उर्फ मुन्ना अर्जुन सिंग (वय 28) – स्पा चालक, सध्या रा. पुनम सृष्टी, मिरारोड पूर्व
नसीम युसुफ शेख (वय 34) – स्पा मॅनेजर, सध्या रा. आंबावाडी, दहिसर पूर्व
या आरोपींनी स्पा मसाजच्या नावाखाली चार पीडित मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची कबुली तपासात दिली. त्यांच्याविरोधात IPC 2023 चे कलम 143(3), 3(5) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी आणि पथक:
ही कारवाई संदीप डोईफोडे (पोलीस उप आयुक्त – गुन्हे) आणि मदन बल्लाळ (सहायक पोलीस आयुक्त – गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पु.नि. देविदास हंडोरे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहाय्यक फौजदार शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, चेतनसिंग राजपूत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, तसेच लतादेवी एक्कलदेवी (अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी संयुक्तरीत्या केली. Mira Road Spa Sex Racket


