महाराष्ट्रमुंबई

Mumbai Rain : मुंबईसह, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर कल्याण अंबरनाथ शहरात वरून राज्याचे आगमन, कडाक्या उन्हापासून नागरिकांना दिलासा

Mumbai Rain Update: मुंबईचा ठाणे जिल्ह्यात मेघगर्जना, कभी अधिक प्रमाणात पाऊस

मुंबई :- कडाक्या उन्हापासून मुंबईकरांना आज दुपारपासूनच दिलासा मिळाला आहे ढगाळ वातावरणामुळे मुंबईत आज तापमानाचे प्रमाण कमी असताना दुपारी तीन वाजल्यानंतर, मुंबई ठाणे कल्याण अंबरनाथ बदलापूर डोंबिवली यासारखे शहरात साधारणपणे 40 ते 50 मिलिमीटर पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे.(Mumbai Rain) पावसामुळे मुंबईकरांना कडाक्या उन्हापासून दोन दिवस का होईना पण समाधान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेला काही दिवसांपासून मुंबईचे तापमान साधारणपणे 40°c पेक्षा जास्त होते बदलापूर अंबरनाथ यांसारख्या शहरात गेल्या कित्येक दिवसात बसून साधारण तापमान हे 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होत होते त्यामुळे गर्मीने नागरिक हैराण झाले होते. Mumbai Weather Update

राज्यातील शेतकऱ्यांचंं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असलं तरी मुंबईत आणि लगतच्या इतर शहरांमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये दुपारच्या वेळी भयंकर ऊन पडत होतं. सूर्य जणू आगच ओकतोय, अशी परिस्थिती होती. त्यामुळे नागरीक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते हे सत्य आहे. अखेर पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत आलेला पाऊस सोबत वेगवाने वाऱ्यासह धुळीचं वातावरणही घेऊन आला. Mumbai Weather Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0