Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-12 च्या हद्दीत पोलिसांचा तक्रार निवारण दिन

पोलिसांचा विशेष तक्रार निवारणदिन!
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या Mumbai Police परिमंडळ 12 हद्दीत शनिवारी (मार्च 15) सुमारे 150 तक्रारींचे निरसन केले, कारवाई सुरू केली.पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष तक्रार निवारणदिनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.


पोलिसांनी तक्रार निवारण दिन करिता 20 जेष्ठ नागरिक, 64 महिला तक्रारदार यांचेसह एकूण 150 तक्रारदार उपस्थित होते. सदर तक्रारदारांचे तक्रारींचे उपस्थित अधिकारी यांनी योग्य निरसण केले आहे. तक्रार निवारण दिन दरम्यान परिमंडळ 12 मधील पोलीस ठाणेमध्ये एकूण 2 दखलपात्र गुन्हे, 26 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 50 अर्जाची निर्गती करण्यात आली आहे. इतर तक्रारदारांचे तक्रारींवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तक्रार निवारण दिन उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.