मुंबई
Trending

Churchgate Staion Fire News : चर्चगेट स्थानकात केक दुकानाला भीषण आग!

Mumbai Churchgate Fire News : शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन दलाने वेळीच आटोक्यात आणली

मुंबई (चर्चगेट) | मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकात केक दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानकावर मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रवाशांना धुरामुळे अस्वस्थता जाणवली.

प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सुदैवाने जीवितहानी टळली

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर काम करत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. चर्चगेट हे अत्यंत वर्दळीचे स्थानक असल्याने याठिकाणी आग लागणे ही गंभीर बाब होती, मात्र वेळीच उपाययोजना झाल्याने मोठा अनर्थ टळला.

समोर आलेल्या व्हिडिओजमध्ये स्टेशन परिसरातून प्रचंड धुराचे लोट उठताना दिसून आले. काही वेळासाठी प्रवाशांची हालचाल थांबवण्यात आली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0