क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News : बहिरामधील 16 वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी 12 तासात अटक केली

Mumbai Police Arrested kidnnaper And Murder From Bhihar : बिहार येथे अपहरण करुन त्यानंतर तेथे खून करुन मुंबईत पळून आलेल्या आरोपीस मुंबई पोलिसांनी 12 तासाच्या आत अटक केली

मुंबई :- बिहार राज्याच्या जिल्हा भागलपुर मुस्तकीम इंग्लिश चिचरोन, या गावी राहणाऱ्या फिर्यादी रहूफ खान (वय 33 रा.राज्य बिहार.) यांचा छोटा भाऊ मो. आलम रहुफ खान, (वय 16) यांचे 5 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. Mumbai Police Arrested kidnnaper 8 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलांचे मृतदेह सापडले. याप्रकरणी अकबर नगर पोलीस ठाणे, Akbar Nagar Police Station भागलपुर, बिहार येथे कलम 140 (2),103,238,61 (2), बी.एन.एस अन्वये अपहरण आणि खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News

गुन्हयाचे गांभिर्य ओळखून गुन्हयातील फरार आरोपी शाहीद राजा उर्फ राजू नसिम खान, (वय 22 रा.जिल्हा भागलपुर, राज्य बिहार ) हा मुंबई येथे पळून आल्याची माहिती बिहार पोलीसांकडून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 मुंबई यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच भायखळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने यांना सर्व हकीकत सांगून तपास करण्याचे आदेश दिले. त्यांनर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, भायखळा पोलीस ठाणे, मुंबई यांनी पाहिजे आरोपीताचा मोबाईल क्रमांक तसेच त्याचे भाऊ यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीची माहिती काढली. आरोपी हा ‘सिटी मून’ हॉटेल,सरदार वल्लभभाई पटेल रोड, डोंगरी, मुंबई या हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. माहिती प्राप्त होताच तात्काळ सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथील एटीसी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व पथक तसेच भायखळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने व पथक यांनी हॉटेलमध्ये जावून शोध घेतला असता तो तेथे मिळून आला. बिहार पोलिसांनी आरोपी तोच असल्याची खात्री करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. Mumbai Latest Crime News

पोलिसांनी आरोपीची कसुन चौकशी केली असता आरोपी यापूर्वी 2022 मध्ये अपहरण, खून, खूनाचा कट व खूनाचा पुरावा नष्ट करणे या गुन्हयामध्ये अटक केले असल्याचे सांगीतले. तसेच तपासामध्ये त्याने सध्या जामिनावर मुक्त झाल्याचे सांगीतले.अकबर नगर पोलीस ठाणे, भागलपुर, बिहार येथील पोलीस उपनिरीक्षक रोहीत व पथक हे भायखळा पोलीस ठाणे येथे आले. बिहार पोलीसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात हजर केले असता 14 नोव्हेंबर रोजी पर्यंत ट्रान्सीट रिमांड देण्यात आले आहे. Mumbai Latest Crime News

पोलीस पथक
सत्यनाराण चौधरी, पोलीस सह आयुक्त (का व सु), अनिल पारसकर, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, दत्तात्रय कांबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, शंकर चिंदरकर, सहायक पोलीस आयुक्त, आग्रीपाडा विभाग, विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भायखळा पोलीस ठाणे, जितेश शिंगोटे, पोलीस निरीक्षक गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस हवालदार पठारे, संजय जाधव,देशमुख, राकेश कदम, पोलीस शिपाई दिगंबर साताळकर, राजेश राठोड, राकेश जाधव, सोमनाथ जगताप, जालींदर पिचड, सोनावणे, देसाई, राजेश पाटील यांनी केली आहे. Mumbai Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
21:40