Mumbai Police News : वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नाईक यांची कारवाई, बेकायदेशीररित्या पिस्टल (बंदूक) बाळगणाऱ्या आरोपीला केले अटक
Mumbai Police Arrested Gun Supplier : आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्राचे विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले अटक, आठ आधुनिक पिस्तूल 138 जिवंत काडतुसे जप्त, पोलिसांनी आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा केला जप्त,
मुंबई :- एन्काऊंटर स्पेशलिस्ट Encounter Specialist Daya Nayak म्हणून ओळख असणाऱ्या तसेच अनेक गॅंगस्टर च्या मुस्क्या आवळणा-या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नाईक यांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीररित्या बंदूक (पिस्तूल) International Gun Supplier Arrested विक्री करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या टोळीतील तीन गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch अटक करून त्यांच्याकडून 08 आधुनिक पिस्तूल आणि 138 जिवंत काडतुसे जप्त केले आहे,हि कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. Mumbai Police Latest News
दया नाईक यांची कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नाईक Encounter Specialist Daya Nayak यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आय एम ए हॉलच्या समोर पीव्हीआर चित्रपट गृहाजवळ गुरुनानक रोड साईनाथ नगर म्हाडा कॉलनी जुही नगर येथे एक व्यक्ती बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती दया नाईक यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शाखा कक्ष-09 यांच्या पथकासह सापळा रचून एका व्यक्तीला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्याचे अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक स्टेनलेस स्टीलचे पिस्टल,07 जिवंत काडतुसे आढळून आले आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. तसेच आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्याकडून पाच पिस्टल,121 जिवंत काडतुसे तसेच त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांकडे दोन पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्या तिन्ही आरोपींकडून एकूण आठ अत्याधुनिक पिस्तूल (बंदूक) आणि 138 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे. तिन्ही आरोपींच्या विरोधात जुईनगर पोलीस ठाण्यात कलम 3,25 शस्त्र अधिनियमन सह कलम 37 (1) अ,135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास कक्षा-09 चे पोलीस करत आहे. Mumbai Police Latest News
08 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
तीन अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना न्यायालयाने 08 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींकडून भविष्यात घडणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करण्यात कक्ष-09 पोलिसांना यश आले आहे. Mumbai Police Latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar , विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त (प्र-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पश्चिम) राजेंद्र शिरतोडे यांच्या मागदर्शनाखाली कक्ष 09, यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक, पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, पोलीस निरीक्षक दिपक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम घोडके, पोलीस उपनिरीक्षक सुजित म्हैसधुने, सहाय्यक फौजदार नरेंद्र पालकर, संतोष काकडे, पोलीस हवालदार सुभाष शिंदे, सुनिल म्हाळसंक, जितेंद्र शिंदे, भिकाणी खडपकर, दुष्यंत कोळी, दत्तात्रय कोळी, सचिन राऊत, संतोष लोखंडे, राहुल पवार, विनय चौगुले, प्रशांत भुमकर, अमोल सोनावणे, शार्दुल बनसोडे, राकेश कदम, गिलेश कदम, सुशांत गवते,विनायक परब, अविनाश झोडगे, शशिकांत निकम मपोशि साधना सावंत, प्राजक्ता धुमाळ यांनी पार पाडली आहे. Mumbai Police Latest News