मुंबई

Mumbai Police News : मुंबई पोलीस दलात पदोन्नतीचा उत्साह! नवीन वर्षाच्या दिनी 8 अंमलदारांचा ‘स्टार’ लावून सन्मान

ठाकूर व्हिलेजमध्ये पार पडला दिमाखदार ‘पिपिंग सेरेमनी’; पोलीस हवालदारांना मिळाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण आज सत्या सभागृहात अनुभवता आला.1 जानेवारी 2026 रोजी, नवीन वर्षाचे स्वागत ड्युटीवर असतानाच पदोन्नतीचा आनंद साजरा करत करण्यात आले. कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर व्हिलेजमधील सत्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात 8 पोलीस अंमलदारांना ‘पोलीस हवालदार’ पदावरून ‘सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक’ (ASI) पदावर बढती देण्यात आली.

खांद्यावर चमकले ‘स्टार’ आणि ‘फित’

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या 30 डिसेंबर 2025 च्या आदेशानुसार या पदोन्नती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काल दुपारी 1.00 वाजता आयोजित ‘पिपिंग सेरेमनी’मध्ये या आठही अंमलदारांच्या खांद्यावर मान्यवरांच्या हस्ते ‘स्टार’ आणि ‘फित’ लावून त्यांचा अधिकृत सन्मान करण्यात आला. पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांच्या चेहऱ्यावर यावेळी सार्थ अभिमान आणि कृतज्ञतेचे भाव पाहायला मिळाले.

कर्तव्यनिष्ठेची मिळाली पोचपावती
वर्षांनुवर्षे मुंबईच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या या अंमलदारांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेऊन ही पदोन्नती देण्यात आली आहे. या सोहळ्यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित होते. नवीन वर्षाची सुरुवात अशा गौरवशाली सोहळ्याने झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0