मुंबई

Mumbai Police News : मुंबई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6 तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने 232 महिलांच्या तक्रारीचे निवारण

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम हाती, तक्रार निवारण दिनाच्या दिवशी महिला तक्रारदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्त मुंबईतील सर्वच परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या पोलिसांना महिला दिनाच्या औचित्य साधून विशेष महिला तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले होते. या तक्रार दिनाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-6 अंतर्गत महिलांनी विशेष तक्रारदार दिनानिमित्त सहभाग नोंदवत तब्बल 232 महिला सहभागी झाल्या होत्या.

मुंबई पोलिसांनी महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण दिनाचे आयोजित करण्यात आले आहे. आज महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई शहरातील सर्वच परिमंडळांतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण दिन आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-6 अंतर्गत येणाऱ्या दहा पोलीस ठाण्यात एकूण दाखल असलेल्या गुन्ह्यातील 345 तक्रारदार आणि अर्जदार उपस्थित होते. यामध्ये 232 महिला तक्रारदार आणि 74 जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

पोलिसांनी,महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला तकादार यांना निर्भया पथक, 103 तकार क्रमांक, पोक्सो कायदा, स्वसंरक्षण, सायबर फसवणूक, फेसबुकद्वारे होणारी फसवणूक, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे तसेच पोलीसांशी कशा प्रकारे सोशलमिडीयाद्‌वारे संपर्क साधवा याबाबत मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी सर्व निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मार्गदर्शन करून निर्भया पथकाचे कार्यपध्दतीबाबत माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0