क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Cyber Crime News : सायबर गुन्हेगारांच्या खात्यातून 300 कोटी रुपये वाचवले, 1930 हेल्पलाईनची कमाल!

Mumbai Latest Cyber Crime News : 1930 हेल्पलाईन मुंबई पोलिसांसाठी ठरली वरदान; फसवणुकीच्या 1.31 लाखांहून अधिक तक्रारींची नोंद

मुंबई: सायबर गुन्ह्यांमधून होणारी Mumbai Cyber Crime फसवणूक रोखण्यासाठी आणि नागरिकांचे पैसे वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांची 1930 सायबर हेल्पलाईन एक वरदान ठरली आहे. 17 मे 2022 पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनने आतापर्यंत तब्बल 302 कोटींहून अधिक रुपयांची रक्कम वाचवून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. Mumbai Latest Cyber Crime News

सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तात्काळ तक्रार नोंदवून पैसे गोठवण्यासाठी ही हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. या हेल्पलाईनमुळे फसवणूक झालेले नागरिक तात्काळ संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकतात.त्यानंतर NCRP पोर्टलवर तक्रार नोंदवून संबंधित बँक खाती तात्काळ गोठवली जातात.

1930 हेल्पलाईनची प्रभावी कामगिरी

17 मे 2022 पासून आतापर्यंत 1930 सायबर हेल्पलाईनवर 13 लाख 19 हजार 403 कॉल आले आहेत. त्यापैकी, 1 लाख 31 हजार 276 तक्रारी NCRP पोर्टलवर नोंदवण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन टास्क, ऑनलाइन शॉपिंग, लोन फ्रॉड आणि जॉब फ्रॉड यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांचा समावेश आहे.

या तक्रारी प्राप्त होताच, हेल्पलाईनवरील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने संबंधित बँक, वॉलेट आणि मर्चंट नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधतात. यामुळे, 8 मे ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीतच तब्बल 113 कोटी 86 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोठवून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. 17 मे 2024 पासून आतापर्यंत एकूण 302 कोटी 5 लाख 88 हजार 92 रुपये वाचवण्यात आले आहेत.

11 हजार सायबर गुन्हेगारांचे नंबर ब्लॉक

जानेवारी 2024 ते जुलै 2025 या काळात विविध सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या गेलेल्या 11 हजार 63 मोबाईल क्रमांकांची पडताळणी करून पोलिसांनी ते ब्लॉक केले आहेत. त्यामुळे, फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

ही प्रभावी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, सहायक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर आणि इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. तसेच, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे आणि 1930 सायबर हेल्पलाईनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0