Mumbai Police News : अनाधिकृत वाहन पार्किंग मुक्त बस स्टॉप, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम
•बस स्टॉप वर बेकायदेशीर रित्या चालत होती पार्किंग, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, बेशिस्त वाहन चालकानवर कारवाई
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उभारला आहे. बेकायदेशीर रित्या बस स्टॉप वर पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांकडून कारवाई. पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दहा दिवसात जवळपास 9 हजार 658 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांच्या या विशेष मोहिमेअंतर्गत बस स्टॉप जवळ वाहन चालक बेशिस्तरीत्या आपले वाहना पार्किंग करत होते. त्यामुळे विद्यार्थी, अपंग व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती यांना बसेस मध्ये चढताना आणि उतरताना अडचणी येत होत्या. पोलिसांनी ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने 24 एप्रिल ते पाच मे या कालावधीत विशेष मोहीम राबवत बस स्टॉप वर पार करणाऱ्या एकूण 9658 वाहनांवर कारवाई करत दहा लाख 21 हजार 710 इतकी तडजोड रक्कम भरणा भरून घेतली आहे.