Mumbai Crime News : सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक
Mumbai Police Arrested Salman Khan House Firing Criminal : दोन्ही आरोपी बिहारमधील रहिवासी असून पोलिसांनी त्यांना गुजरात मधील भूज जिल्ह्यातून अटक
मुंबई :- सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या Salman Khan घरावर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना Mumbai police मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या टीमने गुजरातमधून आवळल्या आरोपींच्या मुसक्या आहेत. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील रहिवाशी आहेत.गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. Mumbai Police Latest Update On Salman Khan Firing
नेमकं काय घडले?
रविवार 14 एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी दोघांना गोळीबार केला होता. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटवर पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी 20 पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोघे आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार गोळ्या झाडल्या होत्या. Mumbai Police Latest Update On Salman Khan Firing
मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, ATS व स्थानिक पोलीस यांनी आरोपींचा कसून शोध घेतला. पनवेलमधील वास्तव्य उघडकीस आल्यानंतर त्या अपार्टमेंटमधील घराचा मालक तसेच जी दुचाकी वारली त्याच्या शोरूमच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. घर मालकाचे नाव राहुल भोपी आहे. आरोपींना घर भाड्याने देताना करारनामा झाला होता का? करारनाम्यासाठी आरोपींनी दिलेली कागदपत्रे खरी होती की खोटी ? याचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांचा तपास चोहोबाजूने सुरु असताना आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.ताब्यात घेतलेले दोन्ही हल्लेखोर पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे हल्लेखोर काही दिवसांपूर्वी हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तेच कागदपत्रे दिले होते. Mumbai Police Latest Update On Salman Khan Firing
पोलीस पथक
गुन्हे शाखा, मुंबई च्या पथकाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) , विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, पोलीस उप-आयुक्त (डी-१) विशाल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक, कक्ष 9 व पोलीस निरीक्षक भरत घोणे कक्ष 11, तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.