Mumbai Crime News : जुन्या वादातून निघृण हत्या
टिळकनगर पोलीसांकडून धडाकेबाज कामगिरी ; खुनाच्या आरोपीस 4 तासात बेड्या, आरोपीविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल
मुंबई :- जुन्या वादातून निघृण हत्या झाल्याची घटना आज (8 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत भिमसेन देवचंद भालेराव, (35 वर्षे) यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला, म्हणून अज्ञात आरोपीविरोधात कलम 302 भादवि अन्यये गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Crime News
टिळक नगर पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने केली अटक
गुन्हयाच्या तपासकामी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, मुंबई हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टिळकनगर पोलीस ठाणे दिपक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस पथके तयार करण्यात आली. पथकाने गुप्त बातमीदारांकडून तसेच तांत्रिक तपासाचे आधारे कौशल्यपुर्ण तपास करीत आरोपी रोहीत दिपक खर्पे, (29 वर्षे) यास ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने मयत इसम व यांचेमध्ये झालेल्या वादातून आरोपी याने वार करून निघृण हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास त्याने केलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजदत्त कांबळे करीत आहेत. Mumbai Crime News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, हेमराजसिंह राजपूत, टिळकनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे (गुन्हे), पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोउनि संदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आत्माराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काकडे, महिला पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा हांडे, महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी शिसोदे, पोलीस हवालदार सुनिल पाटील, संजय शिदि, संदिप गर्जे, सत्यवान माठेलकर, सोमनाथ पोमणे, पोलीस शिपाई रोहीत फरांदे, समिर पिंजारी, गणेश गायकवाड, भारत नागरगोजे, दर्शन कोकाटे, मनोज कड़व, उमेश कटके यांनी यशस्वारित्या पार पाडली आहे. Mumbai Crime News