पुणे

Daund News : म्हणून आम्ही शिंदे गटाला रामराम ठोकला ! ठाकरे गटात प्रवेश ! शिंदे गटाला दौंड मध्ये भगदाड !

Daund News : करेक्ट कार्यक्रम झाला ! ठाकरे गट जिल्हा प्रमुख शरद सुर्यवंशी

Daund News : ता. ८ आताच्या घडीला राज्यातील राजकारण अनेकविध मुद्यांमुळे तापल्याचे पाहायला मिळत आहे. माञ, दौंड तालुक्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या तालुका प्रमुखा बरोबरच शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटात परत आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे दौंड तालुका प्रमुख
शंकर शितोळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत. ते जाताच तालुक्यातील राजकारण फिरले आणि संपूर्ण गटाने धक्का देत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. Daund News

शंकर शितोळे व त्यांचे तालुक्यातील प्रमुख सर्व सहकारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कुरकुंभ येथील मेळाव्यामध्ये जाहीर प्रवेश केला. माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेली विकास कामे, कोरोना मधील लक्षणीय काम यासाठी त्यांचा जगामध्ये त्यांचा गौरव झाला. उध्दव ठाकरे आणि शिवसेना या दोन गोष्टी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये अतिशय खोलवर बिंबलेली असून सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर आढळ श्रद्धा असल्यानेच आम्हाला आमची पक्ष सोडण्याची चूक सुधारून या पुढच्या काळात आम्ही पुन्हा घर वापसीचा निर्णय घेतला अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदे गटाचे तालुकाप्रमुख शंकर शितोळे यांनी यावेळी व्यक्त केली. Daund News

कुरकुंभ एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणकारी प्रकल्प असताना ड्रगचा काळा धंदा तेजीत असल्याबद्दल कुरकुंभच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. शासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे कुरकुंभ ची बदनामी पर्यायाने दौंडची बदनामी होत असून बेकायदा धंदे करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्याची धमक फक्त उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये असून त्त्यांच्या नेतृत्त्वावर आम्ही विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असलेल कार्य करू असं ! अशी ग्वाही यावेळी जिल्हा संपर्क संघटिका मेघना काकडे सहसंघटीका स्वाती ढमाले, उपजिल्हाप्रमुख अनिल
सोनवणे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. Daund News

शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की अन्यायाच्या विरोधात आम्ही कायमच लढा देत आलो असून कुरकुंभकरांवर होत असलेला अन्याय या पुढच्या काळात आम्ही खपून घेणार नाही. तसेच रोजगारासाठी कोणालाही डावलल जाणार नाही. जर कोणी अशी मग्रुरी करत असेल तर त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ. अशा प्रकारचा विश्वास त्यांनी लोकांना विश्वास दिला. शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, औद्योगिक वसाहतीतील निरीक्षक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या सर्वांनी मिळून या ठिकाणी अवैध धंद्यांना पाठीशी घातल्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात चीड असल्याचे या ठिकाणी सूर्यवंशी यांनी सांगितले. Daund News

कुरकूंभमध्ये नवीन शाखा सुरू करुन सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करण्यासाठी शाखाप्रमुख नवनाथ कुंभार, अजित सोनवणे, मंडले यांच्या पुढाकाराने शेकडो तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यातआले.Daund News.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0