
Mumbai Local Train Update : रविवारी (23 मार्च) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकच्या दरम्यान रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल.
मुंबई :- मुंबईकरांनो उद्या सुट्टीचा दिवस असून मुंबई फिरण्याकरिता प्लॅन करणार असाल तर निश्चितच रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पाडा अन्यथा मेगाब्लॉक चा सामना तुम्हाला करावा लागेल.Mumbai Local Train माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल उशिराने धावणार आहेत. Mumbai Sunday Megablock News
माटुंगा ते मुलुंड यादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या वेळेत अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल उशिराने धावतील. Mumbai Local Megablock Update
हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते सायं 4.10 यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी / बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान अमार्गावरउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. चर्चगेट येथे जाणाऱ्या काही फेऱ्या वांद्रे आणि दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्याच स्थानकातून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या उशिराने धावतील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.