Thane Police News : परराज्यातून थेट ठाण्यात ‘पिस्तुली डील’! नौपाडा पोलिसांचा सापळा यशस्वी — जिवंत काडतुसासह तरुण शस्त्रतस्कर गजाआड

ठाणे : भोपालहून ठाण्यात देशी पिस्तूल विक्रीचा थरारक डाव आखणाऱ्या तरुण शस्त्रतस्कराला नौपाडा पोलिसांनी Naupada Police Station सिनेमी पद्धतीने पकडून गुन्हेगारीच्या मुळावर घाव घातला आहे. पोलिसांची चाहूल लागताच पळ काढणाऱ्या आरोपीचा पाठलाग करत ओपन जिम ते सोसायटीपर्यंत पाठशिवणी झाली आणि अखेर ५० हजारांचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. Thane Latest Crime News
दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मध्यप्रदेशातील भोपाल येथून एक इसम अग्निशस्त्र घेऊन नौपाड्यात विक्रीसाठी येणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नौपाडा सर्व्हिस रोडवरील ओपन जिम परिसरात सापळा रचला.
पोलीस दिसताच पळ… पण शेवट गजाआड!
संशयास्पद अवस्थेत बॅग पाठीवर घेऊन उभा असलेला तरुण पोलिसांच्या नजरेत आला. पोलिसांनी जवळ जाताच तो पळ काढू लागला, मात्र नौपाडा तपास पथकाने ओम शांकुतल सोसायटीसमोर त्याला पकडून जमिनीवर पाडले.
तपासात आरोपीचे नाव
कुणाल गोपाल यादव (वय १९)
रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश
असे निष्पन्न झाले.

बॅग उघडताच खळबळ!
आरोपीच्या बॅगेतून
- सिल्व्हर बॉडीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (₹५०,००० किंमतीचे)
- एक जिवंत काडतूस
असा घातक मुद्देमाल आढळून आला. चौकशीत आरोपीने हे शस्त्र भोपालहून विक्रीसाठी ठाण्यात आणल्याची कबुली दिली.
हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल
नौपाडा पोलीस ठाण्यात
गु. रजि. नं. ७४२/२०२५
महाराष्ट्र पोलीस अधिनियम व भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दि. १६/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यामागील मोठे शस्त्रतस्करी जाळे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नौपाडा पोलिसांची तडाखेबंद कामगिरी
ही धडाकेबाज कारवाई
पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे,
सहा. पोलीस आयुक्त संभाजी जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
पोनि (गुन्हे) संजय दवणे
यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि मंगेश भांगे व नौपाडा तपास पथकाने बजावली.
परराज्यातून ठाण्यात शस्त्रांचा काळाबाजार उघड — नौपाडा पोलिसांनी वेळीच घातले ब्रेक!


