मुंबई

Mumbai Local Stations Renaming : मुंबईच्या या आठ रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख, ब्रिटिशकालीन नावं बदलली

Mumbai’s 8 Railway Stations Rename : शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

British-era Local Station Name Change In Mumbai :- महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ब्रिटीश काळात नाव देण्यात आलेल्या मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उत्तन (भाईंदर) आणि विरार (पालघर) दरम्यान सी लिंक बांधण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. Mumbai Local Stations Renaming

आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे.

  • 1- करी रोड स्टेशन- लालबाग स्टेशन
  • 2. मुंबई सेंट्रल- नाना जगन्नाथ शंकर सेठ स्टेशन
  • 3.भूसा रोड- डोंगरी स्टेशन
  • 4.मरीन लाईन्स- मुंबा देवी स्टेशन
  • 5.चर्नी रोड-गिरगाव स्टेशन
  • 6.कॉटन ग्रीन- काळाचौकी स्टेशन
  • 7.किंग सर्कल- तीर्थकर पार्श्वनाथ स्टेशन
  • 8.डॉकयार्ड स्टेशन- माझगाव स्टेशन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.…
किंग्ज सर्कल स्टेशनसह मुंबईतील सात उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीनंतर मध्य मुंबईतील जैन समाजाने स्थानकाचे नामकरण पूज्य जैन तीर्थंकरांच्या नावावर करण्याच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0