Mumbai Local Mega Block : मुंबईमध्ये 31 मार्चला लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक
•Mumbai Railway Mega Block Schedule मुंबईकरांनो रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घरा बाहेर पडा
मुंबई :- रविवारी म्हणजेच 31 मार्च 2024 रोजी घराबाहेर पडण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण ट्रेनचे वेळापत्रक तुमचे नियोजन बिघडवू शकते. मध्य तसेच पश्चिम रेल्वेने मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय भागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. रविवार 31 मार्च 2024 रोजी, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन फास्ट दोन्ही मार्गांवर पाच तासांचा जंबो ब्लॉक लागू केला जाईल. 31 तारखेला सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 पर्यंत हा ब्लॉक असेल. परिणामी, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची त्यानुसार योजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Mumbai Local Mega Block
माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 दरम्यान माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा शिव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येतील. Mumbai Local Mega Block
हार्बर रेल्वे
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत (नेरुळ/बेलापूर-उरण बंदर मार्ग वगळून) ब्लॉक असणार आहे. Mumbai Local Mega Block
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणे येथे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. Mumbai Local Mega Block
डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी 4.00 वाजता असेल आणि पनवेल येथे सायंकाळी 04.52 वाजता पोहोचेल. अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल सायंकाळी 4.26 वाजता ठाणे येथे सायंकाळी 5.20 वाजता पोहोचेल. Mumbai Local Mega Block
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी मार्गावर विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर आणि बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान बंदर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल, असेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले. Mumbai Local Mega Block