Thane Crime News : प्रतिबंधित ‘खैर’ लाकूड वाहतूक करणारा ट्रक चालक अटकेत!

Truck driver arrested for transporting banned ‘Khair’ timber वागळे युनिटच्या कारवाईत सुमारे 41 लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे | ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-5 ने केलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित खैर लाकडाची मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध वाहतूक उघडकीस आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे १७ जूनच्या पहाटे माजिवाडा मार्गावर सापळा रचून ट्रक क्रमांक (GJ-15-YY-5652) ला अडवण्यात आले. तपासणीत 10.5 टन वजनाची खैराची सोलीव लाकडी ओंडके सापडली असून, त्याची किंमत 31 लाख 72 हजार 500 रुपये एवढी आहे.
10.5 टन खैराची लाकडी ओंडके जप्त; माजिवाडा मार्गावर सापळा रचून कारवाई
या कारवाईत ट्रकचालक अनिलकुमार रामचंद्र गुप्ता (वय 54, रा. धुळे) याला अटक करण्यात आली असून, ट्रकसह एकूण 41 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या प्रकरणी वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 303(2), 3(5) तसेच भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(ब), 42, 52(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वागळे युनिटचे अधिकारी करत आहेत.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त (शोध-1 गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, गुन्हे शाखा घटक-5 वागळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस हवालदार पालांडे, निकम, तारी, पोलीस नाईक ठाणेकर, पोलीस शिपाई शिकारे, यादव या पथकाने केली आहे.


