Mumbai Election Result Live : भाजप, ठाकरे गट, यांच्यात मुंबई चुरस, राज ठाकरेंच्या पुत्र अमित ठाकरे आघाडीवर
मुंबई :- सकाळी 8 वाजता आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. Mumbai Election Result त्यानंतर EVM मधील प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. आजच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे.मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईत शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.मागाठणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकरांच आव्हान आहे.
माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आशिष शेलार आघाडीवर आहेत.पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.
चेंबूरमधून उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर, दहीसरमधून भाजपा उमेदवार मनिषा चौधरी आघाडीवर आहेत. मुंबादेवीमधून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल आघाडीवर आहेत.
कांदीवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर, दिंडोशीमधून उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि भांडूप पश्चिममधून उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत.
विलेपार्ल्यातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी आघाडीवर आहेत. सायन-कोळीवाड्यातून भाजपचे उमेदवार तमिल सेल्वन आघाडीवर आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित साटम आघाडीवर आहेत. घाटकोपर पश्चिममधून भाजपचे उमेदवार राम कदम आघाडीवर आहेत.