Mumbai Cyber Scam : सायबर गुन्ह्यातील सिम कार्ड विक्रेत्यास पोलिसांनी केलेल्या अटक
•जवळपास 450 सिम कार्ड विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले
मुंबई :- सायबर गुन्हेतील सिम कार्ड विक्री करणाऱ्या आरोपींला पोलिसांनी अटक केली आहे.27 डिसेंबर 2023 ते 1 एप्रिल 2024 दरम्यान फिर्याद मुसा मोहीयोद्दीन शेख, (72 वर्षे), काम सेवानिवृत्त हे त्यांचे राहते घरी असताना अनोळखी इसमाने मधुकर गावित या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फिर्यादींना फेसबुक मॅसेंजरव्दारे संपर्क करून त्याचा मित्र सी. आर. पी. एफ. मध्ये असुन त्याच्या घरातील वेगवेगळया वस्तु स्वस्तात विकण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना एकुण 1 लाख 76 हजार रूपये पाठविण्यास भाग पाडुन फसवणूक केली आहे, अशी तक्रार फिर्यादी यांनी दिलेवरून वांद्रे पोलीस ठाणे येथे कलम 419,420 भा. दं. वि. सह कलम 66 (क) आणि 66 (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Cyber Scam
गुन्हयाच्या आतापर्यंत केलेल्या तपासावरून सदरचा गुन्हा करण्याकरिता वापरण्यात आलेले सीमकार्ड हे आरोपी नामे अजय प्रल्हाद बिन्हाडे, (25 वर्षे), याने अलवार, राजस्थान येथे विक्री केल्याचे निष्पन्न झालेने त्यास अमळनेर, जि. जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीने एकूण 450 सिमकार्ड अलवार, राजस्थान येथील त्यांचे सहकारी पाहिजे आरोपीना विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे. Mumbai Cyber Scam
पोलीस पथक
वांद्रे पोलीस ठाण्याचे सायबर प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पोलीस हवालदार मदन तानाजी मोरे, संतोष मंगेश पवार, पोलीस शिपाई बनसोडे व गणेश हंचनाळे (तांत्रिक मदत) यांनी सदरची कामगिरी पार पाडली. Mumbai Cyber Scam