Mumbai Cyber Crime News : ऑनलाइन फसवणूक, दोन लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
•Mumbai Cyber Crime News ऑनलाइन टास्कचा बळी, लागून अधिक फसवणूक, उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
उल्हासनगर :- सायबर विभागाकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तरीही काही लोक कळत नकळत ऑनलाइन फसवणुकीचे शिकार होत आहे. अशीच घटना अंबरनाथच्या पालेगाव येथे राहणाऱ्या रवि अशोकलाल सिरवाणी (37 वर्ष), यांच्यासोबत घडलेली आहे.
रवी यांना 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने मेसेज करून त्यांना ऑनलाईन टास्क करिता बिनान्स हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ॲपवर एकुण 2 लाख 61 हजार 589 रूपये रक्कम ऑनलाईन भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के हे करीत आहेत.