मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : मानखुर्द हद्दीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील मुख्य आरोपीस अटक

•आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हे असल्याचा आरोप, पोलिसांनी आरोपीला राजस्थान मधून केले अटक

मुंबई :- आरोपी नावे फैसल उनहुलहक सिध्दीकी उर्फ नागोरी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी असून त्याचेविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी देणे, घातक हत्यारांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचविणे, नुकसान करणे, दंगा करणे, गृहअतिक्रमण करणे, भेसळ करणे, अपायकारक पदार्थाची विक्री करणे व गुटखा प्रतिबंधक कायदयाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. मानखुर्द पोलीस ठाणेस 9 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी यांस काही सराईत आरोपीतांनी जीवे ठार मारण्यचा प्रयत्न केल्याने कलम 307,504,506(2),34 भादविसह कलम 4,25 शस्त्र अधिनियमसह कलम 37(1) (अ), 135 मपोका अन्वये अशपाक खान उर्फ बब्बू, राशीद जग्गा, फैसल सिध्दीकी उर्फ नागौरी व इस्माईल शेख याचेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. Mumbai Crime News

गुन्हयातील आरोपीस अटक करणेकामी परिमंडळ स्तरावर पथक तयार करण्यात आले. नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे फैसल उनहुलहक सिध्दीकी उर्फ नागोरी हा आपले अस्तित्व लपविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीचा गुजरात – राजस्थान असा पाठलाग करीत त्यास 03 मार्च 2024 रोजी दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. त्यास दिल्ली येथे मा. न्यायालयासमक्ष हजर करून 06 मार्च 2024 रोजी मुंबईत आणले असून आज रोजी त्यास रिमांडकामी न्यायालसयामक्ष हजर करण्यात आले असून त्यास 11 मार्च 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनंत शिंदे करीत आहेत. Mumbai Crime News

पोलीस पथक

अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार, पोलीस उपनिरीक्षक अभय काकड, पोलीस उपनिरीक्षक राजु साळुंखे, सहाय्यक फौजदार रमेश धुमाळ, संतोष कांबळे, पोलीस हवालदार सुनिल पाटील, प्रमोद लेंभे, समीर पिंजारी, पोलीस शिपाई देशमुख, पोलीस शिपाई प्रदिप देशमुख यांनी केली आहे. Mumbai Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0