मुंबई

Mumbai Crime News : मुंबईत रिक्षाचोराचं ‘नेटवर्क’ ब्रेक! सहा गुन्ह्यांमध्ये हवा असलेला सराईत ‘राजू’ नवी मुंबईतून जेरबंद; चोरीची रिक्षा हस्तगत

• पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख आणि पथकाची ‘टेक्निकल’ कमाल; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांनी दिला चोराला चकमा

मुंबई :- मुंबईच्या रस्त्यांवरून रिक्षांची चोरी करून सराईतपणे पसार होणाऱ्या एका रिक्षाचोराच्या मुसक्या टिळकनगर पोलिसांनी कसून तपासानंतर आवळल्या आहेत. नवी मुंबईतील तुर्भे येथे राहणाऱ्या या आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली रिक्षाही हस्तगत करण्यात आली आहे.

ऑटोचोर ‘राजू’चा थरारक पाठलाग

परिमंडळ 6 मधील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24/8/2025 रोजी पी. एल. लोखंडे मार्गावरून एका अज्ञात इसमाने ऑटो रिक्षा लंपास केली होती. 303 (1) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल होताच, तपास टिळकनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख यांनी हाती घेतला.

पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि त्यांच्या पथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून न राहता, अत्याधुनिक तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर केला. या ‘टेक्निकल ट्रॅकिंग’मुळे आरोपीचा ठावठिकाणा उघड झाला.

तुर्भेतील घरातून अटक

पोलिसांनी सापळा रचून रिक्षाचोर राजू खरबान कनोजिया (वय 38, रा. तुर्भे, नवी मुंबई) याला थेट त्याच्या राहत्या घरातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेली ऑटो रिक्षा त्वरित हस्तगत केली आहे.

मुंबई-नवी मुंबईतील 6 गुन्हे उघड

अटक आरोपी राजू कनोजिया हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मुंबई आणि नवी मुंबई परिसरात एकूण 5 चोरीचे गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. या कारवाईमुळे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख पुढील तपास करत असून, राजूने आणखी काही रिक्षा चोरी केल्या आहेत का, याचा शोध घेत आहेत.

अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उप आयुक्त समीर शेख आणि सहायक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पोलीस हवालदार सावंत, पोलीस शिपाई पिंजारी, झिणे,नागरगोजे आणि काटकर या कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0