Mumbai Crime News : सराईत गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई
•मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलिसांनी चार सराईत आरोपींना तडीपार केले
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-1 नवघर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार छैलसिंग शिवसिंग जेतावत, मिरारोड याच्यावर 2017 ते 2023 या दरम्यान गुन्हे दाखल असुन नवघर पोलीस ठाण्याचे हद्दीत तसेच त्यालगतचे परिसर नमुद हद्दपार इसमाचे कार्यक्षेत्र आहे. करिता त्यास पोलीस उप आयुक्त कार्यालयीन हद्दपार (तडीपार) आदेश दिले आहेत. Mumbai Crime News
मिरारोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विशाल विनोद गोस्वामी, (28 वर्ष), दहिसर याच्यावर सन 2017 व सन 2023 मध्ये नाशिक रोड, वर्तकनगर, काशिमीरा व मिरारोड पोलीस ठाणे येथील ठिकाणी फसवणुक व मारामारी करणेचे गुन्हे दाखल असून मिरारोड, काशिमीरा पोलीस ठाण्याचे हद्दीत तसेच त्यालगतचे परिसर नमुद हद्दपार इसमाचे कार्यक्षेत्र आहे. करिता त्यास पोलीस उप आयुक्त कार्यालयीन हद्दपार (तडीपार) आदेश दिले आहेत. Mumbai Crime News
नवघर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार शिवप्रसाद कुशाल शेट्टी, (33 वर्ष) भाईंदर याच्यावर सन 2011 व सन 2024 मध्ये दरोडा, घरफोडी, मारामारी, दारुपिवन दंगा बाबत नयानगर, मिरारोड, नवघर, उत्तन पो. ठाण्याचे हद्दीत तसेच त्यालगतचे परिसर नमुद हद्दपार इसमाचे कार्यक्षेत्र आहे. करिता त्यास पोलीस उप आयुक्त कार्यालयीन हद्दपार (तडीपार) आदेश दिले आहेत Mumbai Crime News
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आशिष अरविंद चौबे, काशिमीरा, याच्यावर सन 2008 व सन 2023 मध्ये चोरी, जबरी चोरी, मारमारी, खंडणी दुखापत यासारखे मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात व काशिमीरा पोलीस ठाण्याचे हद्दीत तसेच त्यालगतचे परिसर नमुद हद्दपार इसमाचे कार्यक्षेत्र आहे. करिता त्यास पोलीस उप आयुक्त कार्यालयीन हद्दपार (तडीपार) आदेश अन्वये चारही हद्दपार इसमांना पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1 मीरा-भाईंदर वसई विरार यांनी ठाणे, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, या जिल्हा कार्यक्षेत्रातून हद्दपार केले आहे. Mumbai Crime News