Mumbai Crime News : भायखळा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 14.61 लाखांचा मुद्देमाल जप्त
•Police raided a gambling den in Byculla area तीन पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळूण लावला, डी.पी. वाडी, घोडपदेव, भायखळा येथे पोलिसांची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर धाड मारत पोलिसांनी 34 लोकांवर कारवाई केली आहे
मुंबई :- डी.पी. वाडी, घोडपदेव, भायखळा येथे चालू असलेल्या तीन पत्त्याचा डाव पोलिसांनी उधळूण लावला आहे. पोलिसांनी 34 जणांवर कारवाई करत 14 लाख 61 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्डा चालवणाऱ्या चार साथीदारांनाही अटक केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-3 यांना मिळालेल्या माहितीनुसार डी.पी. वाडी, घोडपदेव, भायखळा, मुंबई या परिसरात तीन पत्त्यांचा जुगाराचा अड्डा (क्लब) चालवत आहे अशी खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी शहानिशा करून आर्थिक गुन्हे शाखा कक्ष-3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी पोलिस निरीक्षक शरद दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक राणे, पोलीस उपनिरीक्षक गोरेगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ पोलीस हवालदार देवार्ड अनभुले, कांबळे देशमुख चव्हाण तांबडे यांनी रविवारी (15 सप्टेंबर) दुपारच्या दरम्यान स्टील इंडस्ट्रिअल कॉर्पोरेशन गोडाऊन मधील रूममध्ये गोटेश्वर मैदान या ठिकाणी चालू असलेल्या क्लब वर छापा टाकून तब्बल 34 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये चार मालकासह तीन जॉकी 19 खेळी आणि आठ कामगार असे एकूण 34 जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी तीन पत्त्याचा डाव आणि 14 लाख 61 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भायखळा पोलीस ठाण्यात येथे कलम 4(अ),5 मुंबई जुगार प्रतिबंध कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती,पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मुंबई लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक शरद धराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अशोक राणे, गणेश गोरेगावकर, सहाय्यक फौजदार कृतिबस राऊळ, पोलीस हवालदार रविंद्र देवार्डे, राहुल अनभुले, सुहास कांबळे, प्रमोद भोजणे, युवराज देशमुख, विकास चव्हाण, संजय तांबडे यांनी पार पाडली आहे.