क्राईम न्यूजमुंबई

Mumbai Crime News : गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांची कामगिरी ; आंतरराज्य घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या बांग्लादेशी टोळीस जेरबंद

मुंबई तसेच इतर राज्यातील एकूण 53 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेस यश

मुंबई :- शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख व त्याचे इतर चार साथीदार हे बांग्लादेशी नागरीक असल्याचे आढळून आले आहे. शाकीर शेख उर्फ गुड्डु याच्या विरोधात मुंबई व आजुबाजुच्या परिसरात सुमारे 30 घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. सदरच्या आरोपीने घरफोडी करण्याकरीता आंतरराज्यीय टोळी बनविली असून तो विमानाने प्रवास करुन पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा या राज्यातील विविध शहरांमध्ये जावून रेकी करुन घरफोडीचे गुन्हे करीत असे. त्याकरीता तो दरवेळी नवनविन सिमकार्ड व मोबाईल फोनचा वापर करीत होता. चोरी केल्यानंतर सदर आरोपीत लगेच पश्चिम बंगाल मार्गे बांग्लादेश येथे पळून जात असत. त्यामुळे त्यांना पकडणे हे आव्हानात्मक होते. Mumbai Crime News

पोलिसांनी आरोपीला केले अटक

मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई कलम454,457,380 भादंवि या घरफोडीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगार शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख,(45 वर्षे) याचा मागील एक वर्षापासून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगना, येथील विविध भागात तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेण्यात येत होता. नमूद पाहिजे आरोपी दिनांक 7 मार्च 2024 रोजी परतून जिल्हा जालना येथे असलेबाबत तांत्रिक तपासाचे आधारे माहिती प्राप्त झाली असता, 8 मार्च 2024 रोजी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे व पोलीस पथक असे परतूर, जिल्हा जालना येथे रवाना करण्यात आले होते. परतूर येथे नमूद पाहिजे आरोपी शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख हा वास्तव्यास असणाऱ्या एका दुमजली घरावर पहाटेच्या सुमारास छापा घातला असता सदर ठिकाणी आरोपी शाकीर उर्फ गुड्डू हैदर शेख याचे सोबत त्याचे इतर साथीदार असल्याचे आढळून आले. कारवाईत एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यात गुन्हयात वापरलेली क्वीड मोटार कार, कटावनी, स्क्रू ड्रायव्हर, चॉपर, कोयता इत्यादी हत्यारे/वस्तू मिळून आल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत चोरीचा माल घेणारे व्यक्तींची माहिती मिळाल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले.अशारितीने बांग्लादेशी आरोपींच्या टोळीस व त्यांना गुन्हयामध्ये मदत करणारे आरोपींना अटक करण्याची कामगिरी मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेने पार पाडलेली आहे. तसेच नमूद शाकीर शेख उर्फ गुड्डू याचेविरुध्द पूर्वी अटक असलेल्या गुन्हयापैकी 4 गुन्हयांमध्ये आरोपीस सजा झाली असून, 08 गुन्हयात अजामिनपात्र वॉरंट, 1 गुन्हयात जामीनपात्र वॉरंट व 1 गुन्हयात जाहिरनामा प्रस्तावित करण्यात आला आहे. Mumbai Crime News

आरोपीवर मुंबईसह इतरत्र असलेले गुन्हे

आरोपीकडे तपास करुन घरफोडीचे मुंबईतील 18 गुन्हे, भुसावळ व जालना जिल्हयात 03 गुन्हे, तसेच तेलंगणा निजामाबाद येथे 13 गुन्हे, तेलंगणा हैदराबाद येथे 07 गुन्हे, गुजरात-अहमदाबाद येथे 04 गुन्हे, पश्चिम बंगाल हावडा, वर्धमान याठिकाणी 07 गुन्हे असे एकूण 53 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) , विशेष पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयकुत (डी विशेष) दत्तात्रय नाळे यांच्या देखरेखीखाली मालमत्ता कक्ष, गुन्हे प्रकटीकरण शाखा मुंबई या कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक संदिप निगडे, सहाय्यक फौजदार उमेश राऊत, पोलीस हवालदार अरुण सावंत, चिंतामण इरनक, तुषार सावंत, विनोद पदमन, विश्वनाथ पोळ, सचिन सावंत, संतोष औटे, पोलीस शिपाई आदित्य जाधव, महिला पोलीस शिपाई रंजना निचिते, पोलीस फौजदार रमेश पासी, पोलीस शिपाई शरद मुकुंदे यांनी बजावलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0