मुंबई

Mumbai Crime News : 25 कोटींच्या महाघोटाळ्याने मुंबई हादरली! – हॉटेल भागीदारीच्या नावाखाली मोठी फसवणूक, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

•वसई येथील ‘फाउंटन सिटी’ हॉटेलच्या मालकांसह तिघांवर गुन्हा; 25 वर्षांच्या कराराचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराचा विश्वासघात; एका वर्षात 25.42 कोटींची रक्कम बुडवली

मुंबई/वसई :- एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 25 वर्षांसाठी भागीदारी कराराचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची तब्बल 25 कोटी 42 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे स्वरूप आणि रक्कम मोठी असल्याने हा तपास तात्काळ आर्थिक गुन्हे विभाग (EOW), मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवचंद्र सुबन्ना शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट 2023 ते 2024 या काळात ही फसवणूक करण्यात आली. वसई (पालघर) येथील हॉटेल फाउंटन सिटी चे भागीदार मालक असलेले आरोपी तल्हा अब्बास मुखी, अमीर तल्हा मुखी, आदिल तल्हा मुखी आणि इतरांनी फिर्यादींशी संगनमत केले.

आरोपींनी फिर्यादींच्या कंपनीला हॉटेल 25 वर्षांसाठी भागीदारी करारावर चालवण्यास देण्याचे आमिष दाखवले. या आमिषावर विश्वास ठेवून फिर्यादींच्या कंपनीने हॉटेल दुरुस्ती आणि इतर कामांसाठी 25 कोटी 42 लाख रुपये खर्च केले. मात्र, आरोपींनी हॉटेलचा ताबा न देता किंवा खर्च केलेली रक्कम परत न करता फिर्यादींचा विश्वासघात केला आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात भा. न्या. सं. 2023 च्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या मोठ्या घोटाळ्याचा तपास आता हाती घेतला असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

vivek

Recent Posts