Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची धडक कारवाई; तीन अट्टल गुन्हेगारांना केले तडीपार

•पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 विजयकांत सागर यांनी तीनही आरोपींना मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तडीपार केली आहे
मुंबई :- पोलीस उप आयुक्त परिमंडळ-7 विजयकांत सागर यांच्या आदेशान्वये मुंबई शहरातील तीन अट्टल गुन्हेगारांना मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जहुर अहमद शेख उर्फ गुड्डू (32 वय), प्रथमेश रवींद्र अहिरे (20 वय) तसेच भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहिल विजय तटकरे (23 वय) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडांचे नावे आहे.
नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधीत राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारी प्रवृत्तीना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा म्हणुन पोलिसांनी या तीन आरोपींना तडीपार केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-7, मुंबई विजयकांत सागर यांनी केली.