मुंबई

Mumbai Crime News : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई! मालाडमधून 4 नागरिक ताब्यात; वसईत करत होते वास्तव्य

•ए.टी.सी. पथकाचा पठाणवाडीत सापळा; बांगलादेशी ओळखपत्रे आणि नागरिकत्व प्रमाणपत्रे जप्त

मुंबई | मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या कुरार पोलीस ठाण्याच्या पथकाने मालाड (पूर्व) परिसरातून चार बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी अटक केली आहे. हे नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय गेल्या काही काळापासून मुंबई आणि पालघर परिसरात राहत होते.

गोपनीय माहितीवरून कारवाई

दिनांक 2,5 आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी कुरार पोलीस ठाण्याचे पोउनि रफीक मुजावर आणि ए.टी.सी. पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना, त्यांना पठाणवाडी, कुरारगाव येथील हुमेरा पार्क गार्डन आणि तुबा हॉटेल परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या चार संशयितांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या घुसखोरांची माहिती

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या इसमांनी आपली खरी ओळख कबूल केली. हे सर्व मूळचे बांगलादेशातील असून सध्या पालघरमधील वसई परिसरात राहत होते.

1) तुहीनुर जॉयनल सरदार (30 वर्षे): रा. वसई, जि. पालघर (मूळ – जिल्हा सातखीरा, बांगलादेश) – व्यवसाय: चिकन शॉप.

2) मोह. अब्दुल मोमिन सरदार (52 वर्षे): रा. वसई (मूळ – जिल्हा जेसोर, बांगलादेश) – व्यवसाय: बिगारी काम.

3) नजरुल इस्लाम बिस्वास (41 वर्षे): रा. वसई (मूळ – जिल्हा सातखिरा, बांगलादेश) – व्यवसाय: भंगार खरेदी/विक्री.

4) मोह. इमामुल हक्क (46 वर्षे): रा. वसई (मूळ – जिल्हा जेसोर, बांगलादेश) – व्यवसाय: बिगारी काम.

कागदपत्रे जप्त आणि पुढील कारवाई

या इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बांगलादेशातील कायम रहिवासी प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र आणि बांगलादेश नॅशनल आय. डी. कार्ड आढळून आले. हे सर्व इसम बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याची खात्री पटल्याने, त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध “रेस्ट्रिक्शन ऑर्डर” (Restriction Order) प्राप्त केली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

ही उल्लेखनिय कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 12) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (समता नगर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक रफीक मुजावर आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0