Mumbai Crime News : नोकराने केला मालकांनीचा खून ; हातातल्या बांगड्याची चोरी
Maid Killed His Owner In Mumbai : गळा आवळून खुन केलेल्या आरोपीस 24 तासात ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस
मुंबई :- धक्कादायक बातमी समोर आली असून, नोकरानेच आपल्या मालकांनीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मलबार हिल पोलीस ठाण्यास फिर्यादी मुकेश गुलाबचंद शहा, ( 67 वर्षे), मलबार या परिसरात राहणारे यांच्या घरात काम करणारा नोकर कन्हैया कुमार संजय पडीत याने (12 मार्च 2024) चोरी करण्याकरीता कोणत्यातरी साधनाने फिर्यादी यांची पत्नी ज्योती शहा वय (67 वर्ष) हिचा गळा आवळून जीवे ठार मारून तिच्या हातातील 3 लाख किंमतीच्या हिंरेजडीत दोन सोन्याच्या बांगडया चोरी करून पळून गेलेला आहे अशी फिर्याद दिल्याने कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Mumbai Crime News
घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने तात्काळ अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या अधिपत्याखालील पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांची तपासकामी 15 पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळ व परिसरात तसेच फरार आरोपींच्या नातेवाईकांकडे व मित्राकडे चौकशी करण्यात आली. तपास पथके परिसरातील व शहरातील बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन परिसरात पाठविण्यात आली. एकंदरीत साक्षीदारांच्या चौकशीत व तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपीस भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्हयाच्या तपासात जळगाव जिल्हा पोलीस , रेल्वे सुरक्षा बल भुसावळ व जी आर पी भुसावळ यांची मदत घेण्यात आली होती. Mumbai Crime News
पोलीस पथक
पोलीस सह आयुक्त सत्य नारायण, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) डॉ. अभिनव देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02 (अतिरिक्त कार्यभार) संजय लाटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गावदेवी) विनायक मेर यांच्या देखरेखी खाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे, पोलीस निरीक्षक आंधे (तपासी अधिकारी), पोलीस निरीक्षक पवार,पोलीस उपनिरीक्षक ससे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे (सायबर अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक लोहरे व तडीपार, एटीसी, गुन्हें प्रकटीकरण पथक, पोलीस शिपाई सुशांत पवार मलबार हिल पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक पटेल व गुन्हे प्रकटीकरण पथक (डोंगरी पो. ठाणे) सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे (सायबर अधिकारी) गावदेवि पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयेकर व मुन्ना सिंग (परिमंडळ 2 कार्यालय) इत्यादी यांनी पार पाडली आहे. Mumbai Crime News
नागरीकांना मुंबई पोलीस दलातर्फे अहवान करण्यात येते
घरकामाकरीता नोकर ठेवण्यापुर्वी त्यांची चारीत्र्य पडताळणी (PCC) करून घेणे व पोलीसांना माहिती देणे देखील आवश्यक आहे.