मुंबई

Mumbai Crime News : वृद्धाला ‘रियाल’चे आमिष दाखवून 2 लाखांना फसवले! – सौदी चलनाऐवजी कागदी बंडल; मुंबई गुन्हे शाखेने तिन्ही सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

•स्वस्तात पाच लाखांचे चलन देण्याचे खोटे आश्वासन; कुर्ल्यात व्यवहारानंतर अब्बास अली यांची फसवणूक; सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जेरबंद

मुंबई :- सौदी अरेबियाचे चलन असलेल्या ‘रियाल’च्या बदल्यात कागदी बंडल देऊन, एका 76 वर्षीय वृद्धाकडून दोन लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखेच्या परिमंडळ-3 च्या पथकाने अटक केली आहे.

भायखळा परिसरात राहणारे तक्रारदार अब्बास अली (वय 76) यांना काही दिवसांपूर्वी एका आरोपीने भेटून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सौदी अरेबियाचे रियाल चलन असून ते कमी किमतीत विकायचे असल्याचे सांगितले. पाच लाख रुपयांचे रियाल केवळ दोन लाख रुपयांना विकण्यास तो तयार झाल्याने अली यांनी त्वरित होकार दिला.

ठरल्या वेळेनुसार अब्बास अली दोन लाख रुपये घेऊन कुर्ला येथे आले. आरोपीने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कथित रियालची पिशवी दिली आणि लगेच घटनास्थळावरून पोबारा केला. अली यांनी पिशवी उघडून पाहताच, त्यात चलनाच्या ऐवजी केवळ कागदी बंडल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी या प्रकरणी उस्मान अस्लम (वय 32), हसन शेख (वय 26) आणि रहीम खान (वय 36) या तिघांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0