...
क्राईम न्यूज

Mumbai Crime News : गुन्हे अंमली पदार्थ विरोधी कक्ष-7, मुंबई च्या पथकाने आरोपीकडून एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विकून आलेली रोख रक्कम रूपये 3 कोटी 46 लाखा 68 हजार 200 रुपये हस्तगत

Mumbai Crime News Cime Branch Unit 7 Busted Drug Racket : – सहा आरोपी अटक, 03 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई :- सांगलीतील एमडी MD Drug कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असून सहा रुपये नाटक केले आहे अटक आरोपींना 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे.गोपनिय माहितीच्या आधारे 16 फेब्रुवारी रोजी सापळा रचुन एका महिला आरोपीस चेंबुर-सांताकुड़ा लिंकरोड, कुर्ला (प), मुंबई येथुन एकुण 641 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थाचे व्यवसायामधुन मिळविलेली रोख रक्कम रू. 12.20 लाख रूपये व 25 ग्रॅम (कि.अं.रू. 1 लाख 50 हजार 420 ) सोन्याच्या दागिण्यांसह अटक करण्यात आली. सदरबाबत कुर्ला पोलीस ठाणे येथे कलम 8 (क), 22 (क), 29 अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून सदरचा गुन्हा वरिष्ठांवे आदेशान्वये पुढील तपासासाठी कक्ष-7 कार्यालयाकडे घेण्यात आला. Mumbai Crime News

महिला आरोपीकडे केलेल्या चौकशीत तीने सदरचा एम.डी. हा अंमली पदार्थ मिरा रोड येथील तीच्या ओळखीच्या इसमाकडुन आणला असल्याचे सांगितले. त्यावरून कक्ष-7चे पथकाने एका पुरूष आरोपीतास मीरा रोड येथुन 03 कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. हा अंमली पदार्थ (अं. कि.रू. 6 कोटी) व रू. 3.68 लाख रोख रक्कमेसह ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा एम.डी. हा अंमली पदार्थ सुरत, गुजरात येथे राहणाऱ्या 02 इसमांना दिल्याचे सांगितल्याने सदर इसमांना सुरत, गुजरात येथुन अटक करण्यात आली. Mumbai Crime News

सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना आरोपीतांकडे व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीवरून तसेच तांत्रिक तपासाव्दारे आणि पोलीस पथकाने वेगवेगळ्‌या ठिकाणी पाळत ठेवुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक 25 मार्च 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाल पोलीस ठाणे हद्दीत इरळी या गावात धडक कारवाई करून एम.डी. हा अंमली पदार्थ बनविणाऱ्या कारखान्यावा शोध घेऊन एकूण 122.500 कि.ग्रॅ. वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ (अं.कि. रू. 245 कोटी) तसेच एम. डी. बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहीत्य व गुन्हयात वापरलेले वाहन ताब्यात घेतले, सदर कारवाईमध्ये एकुण 06 पुरुष आरोपीतांना अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने आरोपींना दिनांक 3 एप्रिल 2024 पोलीस कोठडी सुनावली.

गुन्हयातील मुख्य आरोपीकडे केलेल्या अधिक तपासामध्ये आरोपीने अंमली पदार्थ विक्रीतुन कमावलेले 3 कोटी 46 लाखा 68 हजार 200 रूपये भिवंडी, जि. ठाणे येथील घरात लपवून ठेवलेले हे 29 मार्च 2024 रोजी जप्त करण्यात आले. सदर तपासमध्ये अ‌द्यापपर्यंत 126 किलो 641.5 ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ किंमत २५२,२८,००,००० रूपये, 25.07 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 50 हजार 420 रूपये, गुन्हयात वापरलेली स्कोडा कंपनीची कार तसेच रोख 3 कोटी 62 लाख 56 हजार 200 रूपये असा एकूण 256 कोटी 02 लाख 06 हजार 620 रूपये (दोनशे छप्पन करोड दोन लाख सहा हजार सहाशे वीस रूपये) किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर Mumbai CP Vivek Phansalkar , विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष-7 गु.प्र.शा., गु.अ.वि., घाटकोपर, मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, पोलीस निरीक्षक निरज उबाळे, महिला पोलीस निरीक्षक स्वप्ना शहापुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी (कक्ष-५), पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेलार, नामदेव परबळकर, महिला पोलीस फौजदार निधी धुमाळ, स्नेहा नाईक, सहाय्यक पोलीस फौजदार अरूण सावंत, तानाजी उबाळे, पोलीस हवालदार दिपक पवार, संतोष गुरव, प्रदीप बडगुजर, सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, अजय बल्लाळ, गिरीष जोशी, अस्लम शेख, विनोद शिरापुरी, प्रमोद जाधव, प्रकाश भोई, महिला पोलीस शिपाई सिमा तिरोडकर, पोलीस नाईक विलास राऊत, पोलीस शिपाई प्रमोद शिंदे, लुकमान सय्यद, महेश सावंत,जितेंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई हिना शेख, राजाराम कदम, दिलिपराव राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
Seraphinite AcceleratorOptimized by Seraphinite Accelerator
Turns on site high speed to be attractive for people and search engines.