अंमलबजावणी :- अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाची कारवाई : चेंबूर परिसरातून 02 अल्पवयीन व 01 प्रौढ मुलीची देहविक्रीतून मुक्तता
Mumbai Crime News : देहविक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे सुटका, देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी केले अटक
मुंबई :- देहविक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे सुटका करून देहविक्री भाग पाडणाऱ्या दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.19 एप्रिल रोजी गुन्हे शाखा, अंमलबजावणी कक्षास त्यांच्या खास बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, शबनम उर्फ सुजाता नावाची महिला ही गि-हाईकांना शारिरीक सबंधाकरीता अल्पवयीन मुली पुरवून वेश्याव्यवसाय करीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर माहितीची शहानिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. Mumbai Crime News
19 एप्रिल रोजी वेश्यादलाल महिला नामे शबनम उर्फ सुजाता हसन शेख 36 वर्षे हिने दोन अल्पवयीन पिडीत मुलीस तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतुन फूस लावून देहविक्री करीता प्रवृत्त व उपलब्ध करून चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतील “डायमंड गार्डन” सायन ट्रॉम्बे रोड, चेम्बुर पुर्व मुंबई या ठिकाणी शारिरीक सबंधाकरीता पुरविले व मुलींचा वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजिविकेसाठी स्विकारताना मिळून आल्याने तिच्या विरुध्द चेम्बूर पोलीस ठाणे येथे 20 एप्रिल रोजी कलम 366 (अ), 370 (अ) (1), 372 भा.द.वि सह कलम 4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा सह कलम 16,17,18 बालकांचे लैंगिक शोषणापासुन संरक्षण अधिनियम 2012 सह कलम 81,87 जे. जे ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Mumbai Crime News
देह विक्री करण्याकरीता प्रवृत्त करणाऱ्या महिला आरोपीचे नाव: शबनम उर्फ सुजाता हसन शेख, (36 वर्षे) कारवाईत 02 अल्पवयीन मुली व 01 प्रौढ मुलींची देहविक्रीतून सुटका केली व रोख रक्कम रु 10 हजार व अंदाजे किं. रु 8 हजार चा एक मोबाईल फोन चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Mumbai Crime News
पोलीस पथक
विवेक फणसळकर पोलीस आयुक्त (Mumbai CP Vivek Phansalkar) , देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त, लखमी गौतम पोलीस सह आयुक्त, (गुन्हे), शशी कुमार मीना अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), रागसुधा आर. पोलीस उप-आयुक्त (अंमलबजावणी), सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमलबजावणी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक अनिता कदम, पोलीस शिपाई घाडी, पोलीस हवालदार जेडगुले, महिला पोलीस शिपाई दराडे यांनी यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे.