Mumbai Crime News : मुंबई सायबर विभागाची मोठी कारवाई ; ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
•दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांची मोठी कारवाई सायबर गुन्हेगारी करणाऱ्या एका टोळीचा बिमोड केला
मुंबई :– सायबर गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी लागणारी बँक खाते पुरविणारे टोळी पकडून त्यांचे सर्व खाते गोठवण्यात दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना यश आले आहे. कुलाबा येथे राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली होती की, पार्ट टाइम जॉब देऊन त्याद्वारे अधिक पैशाचे आमिष दाखविले होते. त्याद्वारे महिलेने 14 लाख 23 हजार रुपयाची गुंतवणूक केली. त्याद्वारे त्या महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली तक्रारीवरून पोलिसांनी कलम 419 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 66 क, 66 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपीत यांनी फिर्यादी यांना विविध खात्यांवर पैसे टाकण्यास सांगीतले होते त्यापैकी फेडरल बॅकं खात्याचे धारक याचा शोध घेउन पुढिल तपास केला असता खातेधारक हा नाशिक येथील हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करीत असुन त्याने त्याचे खाते नाशिक मधिल एका तरूणास वापर करण्यास दिले होते. याबाबत अधीक तपास केला असता आरोपीतानी नाशिक व परीसरातील विविध हॉटेल मध्ये काम करणारे इसम व त्याचे मित्र यांच्या नावाचा वापर करुन अनेक खाते उघडल्याचे व त्याना बैंक खात्याचा वापर करुन अमेरीकन डॉलर खरेदी करुन परदेशातील पाहीजे आरोपींना दिल्याचे झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपी यांची नावे
१) हिमांशु रविंद्र मोरे (21 वर्ष ) नाशिक
2) प्रेम दादाजी शेवाळे (18 वर्ष )
नाशिक,
वेगवेगळ्या बँकांचे 29 डेबीट कार्ड, 28 बँक खात्यांचे पासबुक व वेलकम कीट लेटर , वेगवेळ्या कंपनीचे 8 सिमकार्ड, 8विविध कंपनीचे मोबाइल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती,सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई शशिकुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर, गुन्हे शाखा, अबुराव सोनावणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गोपाळे, सहाय्यर पोलीस निरीक्षक दिपक देसले, पोलीस हवालदार मधुकर लहारे, पोलीस शिपाई सचिन धोत्रे, नितीन शिंदे यांनी केली.