Mumbai Crime News : अट्टल मोबाईल चोर जेरबंद, 16 मोबाईल पोलिसांनी केले जप्त
•जोगेश्वरी, मालाड, अंधेरी या ठिकाणाहून चोरत होता मोबाईल, 16 मोबाईलसह सराईत मोबाईल चोरास पोलिसांनी केले जेरबंद
मुंबई :- मोबाईल फोन पळवणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांना बेड्या ठोकायला यश आले आहे. दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोबाईल चोरास ताब्यात घेतले आहे.अटक केल्यानंतर या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी कसून चौकशी केली. या आरोपींकडून आतापर्यंत 16 मोबाईल फोन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.तसेच आतापर्यंत 1.60 लाखाचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सराईत मोबाईल चोराच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. मोबाईल चोरांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष असून दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाणे,येथील सराईत मोबाईल चोर असलेला मोहम्मद साबीर अहमद शेख उर्फ साबीर बाकडा (42 वर्ष,रा. जोगेश्वरी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे मोहम्मद त्याच्या हालचालींवर लक्ष होते. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. दा.नौ. नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कलम 380 गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांना आरोपीने कबूल दिली आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत अंधेरी, जोगेश्वरी,मालाड या परिसरातून तब्बल 16 मोबाईल चोरी केल्याचे कबुली केले आहे. पोलिसांनी एक लाख 60 हजार रुपये किमतीचे 16 मोबाईल चोरट्याकडून हस्तगत करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, आरोपीच्या विरोधात जोगेश्वरी, मालाड आणि अंधेरी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
दा. नौ. नगर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल घाडगे, पोलीस हवालदार पाटील, गायकवाड,हळदे, पोलीस शिपाई पांढरे,रांजणे यांनी पार पाडली आहे.