कल्याण : वाईन शॉप मध्ये लाखो रुपयाची चोरी, एक्झिट फॅनच्या मार्गाने चोरट्यांचा प्रवेश..
कल्याण :- कल्याण पश्चिम येथील नेहरू चौकात असलेल्या गिरीश वाईन शॉप मध्ये चोरट्यांनी दरोडा टाकत 04 लाख 75 हजार रुपये लंपास केले आहे. चोरट्यांनी वाईन शॉप च्या एक्झिट फॅनच्या मार्गाने दुकानामध्ये प्रवेश करून लाखो रुपयाची चोरी केल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, 2 ऑगस्टच्या पहाटे च्या दरम्यान खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेहरू चौकातील गिरीश वाईन शॉप मध्ये दरोडा टाकल्याची तक्रार वाईन शॉप चे मालक प्रताप लुधवानी (64 वर्ष) यांनी दाखल केली होती. घटनास्थळी पोलिसांचे एक पथक पाहणी करून केली असता असे निदर्शनास आले की चोरट्यांनी वाईन शॉप च्या एक्झिट फॅनच्या मार्गाने दुकानांमध्ये प्रवेश केला. आणि वाईन शॉप च्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे दुकानातील चार लाख 75 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी वाईन शॉप च्या मालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(3),331(4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वंजारे हे करत आहे. पोलिसांनी दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेल्या असुन पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.