मुंबई

Mumbai Crime News : देवनार परिसरात बांगलादेशी महिलेवर कारवाई; अवैध मार्गाने भारतात प्रवेश

मूळ गाव खुलना, बांगलादेश येथील रहिवासी; हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू ; पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाकडून गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम यशस्वी

मुंबई :- मुंबईतील देवनार पोलिसांनी एक मोठी कारवाई करत, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय आणि परवानगीशिवाय भारतात अवैध मार्गाने वास्तव्य करत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पकडले आहे.

काय आहे प्रकरण?

परिमंडळ-6 अंतर्गत असलेल्या देवनार पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाला त्यांच्या हद्दीत एका बांगलादेशी महिलेचे वास्तव्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली.

पोलिसांना जरीना खातून मो. हसमत अली बिस्वास (वय 36) ही महिला मिळून आली. चौकशीत ती मूळची रूपशा, तुतपारा, खुलना, बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तिने कोणत्याही मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय अवैध मार्गाने भारतात प्रवेश केला होता. तिच्याकडून बांगलादेशातील कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.हद्दपारीची कारवाई सुरू या महिलेला आता भारताबाहेर हद्दपार (Deport) करण्याची आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया देवनार पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

अपर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि पोलीस उप आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0