मुंबईक्राईम न्यूज

Mumbai Crime News : दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांची कारवाई ; कलकत्ता येथे कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

मुंबई ‌:-(7 मार्च ) रोजी महर्षि कर्वे रोड चर्चगेट येथे राहणारे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई येथे कलम 419,420,467,120 (ब) भादवि सह 66 (क), 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील नमुद फिर्यादी यांनी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 03 मार्च 2024 रोजी पर्यंतच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने तक्रारदार व त्यांचे कुटूंब यांचे बँक खाते, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड यांची माहीती मिळवुन तक्रारदार यांच्या संमती शिवाय तक्रारदार, त्यांची पत्नी व परदेशात राहणारी मुलगी यांच्या HDFC बँकेच्या बचत खात्यामधुन पैसे क्रेडीट कार्ड मध्ये वळवुन क्रेडीट कार्ड व्दारे, Flipkart, Caratlane, Myntra, Swiggy या वेगवेगळया ऑनलाईन पोर्टलचा वापर करून एकुण 1 कोटी 48 लाख 56 हजार ची खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. Mumbai Crime News

गुन्हयातील पाहीजे आरोपी यांनी क्रेडीट व्दारे महागड्या वस्तु मागविलेल्या आहेत. व त्या कोलकत्ता येथे विविध ठिकाणी डिलीव्हरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथक कोलकत्ता येथे रवाना करण्यात आले होते. ठिकाणी पोलीस आल्याचे कळताच आरोपी सिलीगुडी येथे पळुन गेले होते. सदर ठिकाणी जावुन स्थानिक पोलीस ठाणेचे मदतीने आरोपीना क्षिताफिने ताब्यात घेण्यात आले. व चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. अटक 7 आरोपीना सिलीगुडी येथील न्यायालयात हजर करून त्यांचे 16 मार्च 2024 रोजी पंर्यत ट्रान्झीट रिमांड घेण्यात आले. आरोपी हे कोलकत्ता येथे कॉलसेंटर चालवत असुन भारतीय व परकीय नागरिकांना क्रेडीट कार्ड सुरक्षितते बाबत कॉल करून त्यांच्या क्रेडीट कार्डची माहीती मिळवुन त्याचा वापर करून ऑनलाईन शॉपींग करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. Mumbai Crime News

अटक आरोपीची नांवे

1.रयान कालौल शाहदास (22 वर्षे)

2.अरूणभा अमिताभौ हल्डर, (22 वर्षे)

3.रितम अनिमेश मंडल, (23 वर्षे)

4.तमोजीत शेखर सरकार, (22 वर्षे)

5.रजिब सुखचांद शेख, (24 वर्षे)

6.सुजोय जयंतो नासकर (23 वर्षे)

7.रोहीत बरून बैदय, (23 वर्षे)

सर्व अटक आरोपी कलकत्ता येथे राहणारे आहेत. जप्त मालमत्ता रोख रक्कम 50 लाख, 27 मोबाईल फोन,5 वॉच, 3 एअर बर्ड, 1मॅकबुक, 1 आयपॅड, 11 परफ्युम बाटल्या, 2लेडीज बॅग, 2 फ्रिज, 2 एअर कंडिशनर, 2 प्रिंटर, 1किचन चिमणी. Mumbai Crime News

फिर्यादी यांची फसवणुक झालेल्या एकुण 1 कोटी 46 लाखा 56 हजार रूपये रक्कमेतील 60 लाख रू. किंमतीच्या वस्तूंची ऑनलाईन पोर्टल व्दारे डिलीव्हरी केली होती व इतर मालाची डिलीव्हरी तात्काळ तक्रार केल्याने थांबविण्यात आलेली आहे. नागरिकांना आहवान करण्यात येते की, आपली वैयक्तिक माहीती कोणालाही देवु नये व आपली ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ 1930 या क्रमांकावर तक्रार करावी. Mumbai Crime News

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयक्त, बृहन्मुंबई देवेन भारती Deven Bharti, सह पोलीस आयुक्त,गुन्हे, मुंबई लखमी गौतम Lakhmi Gautam, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई शशिकुमार मिना Shashi Kumar Meena, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर, गुन्हे शाखा, अबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक किरण जाधव, पोलीस निरीक्षक मर्गेश मजगर, पोलीस उप निरीक्षक सचिन त्रिमुखे, पोलीस उपनिरीक्षक श्वेता कढणे, पोलीस उपनिरीक्षक धनवेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम घोडके, पोलीस नाईक संतोष गलांडे, संदिपान खरजे, प्रविण चाळके, किरण झुंजार पोलीस शिपाई निखील गाडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0