मुंबई

Mumbai Crime News: अवैध दारु वाहतुक करणा-या आरोपीस अटक

Mumbai Police Caught Alcohol Worth 11 Lakh – 11 लाख 30 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश

नालासोपारा :- पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत रात्रौगस्त करत असतांना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, पेल्हार पोलीस ठाणे हद्दीतुन (29 फेब्रुवारी रात्री 01.00 वा.च्या ) सुमारास एक इसम बोलेरो पिकअप वाहनाने बेकायदेशिर पणे अवैधरित्या दारु घेऊन गुजरात राज्य येथे विक्री करीता घेऊन जाणार असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरबाबत श्री. कुमारगौरव धादवड, प्रभारी पोलीस निरीक्षक , पेल्हार पोलीस ठाणे यांना माहिती दिली असता त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिले. Mumbai Crime News

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशान्वये पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर बातमीच्या अनुशंगाने जायका हॉटेलच्या समोर, वाकनपाडा, नालासोपारा येथे सापळा रचुन व्यक्ती नावे लवकुश रामनिवास मिश्रा, (43 वर्षे), पिकअप टेम्पोसह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेल्या बोलेरो पिकअपची तपासणी केली असता पिकअप मध्ये 2 लाख 30 हजार 400 किंमतीचे न्यु टुबोर्ग क्लासिक विथ स्कॉच माल्टस कंपनीचे एकुण 60 बॉक्स त्यामध्ये 1 हजार 440 बियरचे टिन मिळून आले असुन एकुण 11 लाख 30 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पेल्हार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे. Mumbai Crime News

पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली कुमारगौरव धादवड, प्रभारी पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, पोलीस अंमलदार संजय मासाळ, रवि वानखेडे, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, राहुल कर्पे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0