Mumbai Breaking News : सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वाचे आवाहन ; 1992 बॉम्बस्फोटातील आपदग्रस्तांच्या अधिकृत वारसाकरीता
•मुंबई येथे घडलेल्या सन 1992-93 जातीय दंगल / बॉम्बस्फोटामधील आपदग्रस्तांच्या अधिकृत वारसांना आवाहन
मुंबई :- सर्वोज न्यायालयाने रिट याचिका (सिव्हिल) 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये मुंबईत सन 1992-93 माली झालेल्या जातीय दंगलीत/बॉम्बस्फोटात मृत/बेपत्ता झालेल्या ज्या व्यक्तीच्या वारसांना अद्याप सानुग्रह अनुदान प्राप्त झाले नाही त्यांना महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णयाप्रमाणे जुलै, 1993 आणि 22 जुलै, 1998 अन्वये सानुग्रह अनुदान देणेबाबत तथा ज्यांना विलंबाने ते अनुदान दिले आहे त्यांना अशा अनुदानावर व्याज देणेबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, सदर समितीच्या 19 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार दंगल बॉम्बस्फोटातील मृत/बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना प्रलंबित आर्थिक मदत मिळण्याच्या अनुषंगाने जाहीर आवाहन प्रसिध्द करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. Mumbai Breaking News
आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित मृत/बेपत्ता व्यक्तीच्या वारसांनी एक (1) महिन्याच्या आत खाद्योल नमूद पत्यावर किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह संपर्क साधावा. मुंबईच्या ओल्ड कस्टम कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Breaking News
या संकेतस्थळाला भेट द्यावी
ज्या मृत / बेपत्ता व्यक्तीच्या वारसांबाबत अनेक प्रकारे करुनही अद्याप काहीही माहिती मिळून आलेली नाही अशा व्यक्तींची यादी https://muanhaicity.gov.in/, https://mumbaisuburban.gov.in/ https://legalservices.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर लावण्यात आली आहे.