MNS Vs Sanjay Raut : मनसेकडून ठाकरे गटाच्या नेत्याने चक्क मनोरुग्णालयात ऍडमिशन घेतले
•महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ठाकरे गटाच्या प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्ण रुग्णालयात ॲडमिट करण्याकरिता दाखला घेतला आहे
मुंबई :- सरकारच्या भूमिकेवर सातत्याने टीका करत केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न दररोज करणाऱ्या संजय राव त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती यांना बिनशर पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत यांनी मनसेवर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर ते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करत आहेत. मनसे सुद्धा संजय राऊत यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. आतापर्यंत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी टीका करताना, संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं म्हटलं होतं. पण एकापक्षाने त्यापुढे जात, चक्क संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा फॉर्म भरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी फॉर्म भरला आहे. हॉस्पिटलच्या एडमिशन अर्जामध्ये त्यांनी आपण संजय राऊत संपादक, सामना तथा खासदार यांचे हितचिंतक असल्याचे नमूद केले आहे. अर्जासोबत विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या बातम्यांच्या सीडी आणि पेन ड्राईव्ह स्वरूपात देण्यात आल्या आहेत.
संजय ऊर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातील विधान पाहता यांना मनोरुग्णालाय दाखल करणं गरजेच आहे. कधी त्यांना पवार साहेब या देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. कधी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार वाटतात. उद्धवजी पंतप्रधानपदाचे उमेदवार का असू नये? असं ते बोलतात. मनसेच्या वतीने पुणे येरवडा येथे असलेल्या मनोगरुग्णालयाचा संजय राऊत यांचा एडमिशन फॉर्म भरला आहे” असं गजनान काळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना गेट वेल सून म्हटलं आहे. “अॅडमिट होऊन योग्य उपचार घेऊनच आणि पूर्ण बरे होऊनच परत यावे…काळजी घ्या … !!!” असं सुद्धा म्हटलं आहे.