MNS Vardhapan Din : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन 18वा दिन नाशिकमध्ये
Raj Thackeray From Kalaram Mandir Nashik : राज ठाकरे सह परिवार काळाराम मंदिरात दर्शन
नाशिक :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना Maharashtra Navnirman sena प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असून यंदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा MNS Vardhapan Din वर्धापन दिन नाशिक मध्ये साजरा करणार आहे. आज सकाळीच त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील पत्नीसह उपस्थित होते. संपूर्ण ठाकरे कुटुंबाने काळाराम मंदिरात पूजा करून आरती केली. यावेळी मनसेचे प्रमुख नेतेही हजर होते.
यंदा मनसेचा अठरावा वर्धापन दिन MNS Vardhapan Din सोहळा हा नाशिकमध्ये होणार आहे. मनसेला पुन्हा एकदा गत वैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांना मानणारा नाशिकमध्ये मोठा मतदार वर्ग आहे. नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा दबदबा कायमच दिसून आला आहे. नाशिक मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभांना देखील प्रचंड गर्दी होते.त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष आहे.
नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यासाठी ते पुणे येथे देखील गेले होते. मात्र, पुणे येथे राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीला मनसेचे पदाधिकारी उशिरा आले, त्यामुळे राज ठाकरे यांनी पुणे सोडून थेट मुंबई गाठले होते. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. पुण्यात घडलेला प्रकार नाशिकमध्ये होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. या माध्यमातून नाशिक मध्ये मनसेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.