महाराष्ट्र

MLA Kiran Sarnaik Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाईकासह सहा जणांचा मृत्यू

•MLA Kiran Sarnaik Accident अलोका येथे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

अकोला :- अकोला जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात दोन अर्भकांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडितांमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईकचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. याशिवाय शिवाजी आमले (30‌ वर्ष), सिद्धार्थ यशवंत इंगळे (35 वर्ष) आणि नऊ महिन्यांच्या बालकाची आतापर्यंत ओळख पटली आहे. MLA Kiran Sarnaik Accident

अकोला-वाशिम महामार्गावरील पातूर घाटाजवळ उड्डाणपुलावर दुपारी हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचे चक्काचूर झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. MLA Kiran Sarnaik Accident

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0