MLA Ashish Shelar : आयडालॉजी तडीपार आणि रोज गळ्यात नवा हार ; आमदार आशिष शेलार

BJP MLA Ashish Shelar ON Uddhav Thackeray : भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई :- भाजपाचे आमदार आशिष शेलार BJP MLA Ashish Shelar यांनी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा साधत पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या टीका केली आहे.मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. हिंदुत्वाला तिलांजली देऊन हल्ली हल्ली तर उबाठा नामक गट “समाजवादी” झाले. नेमकी आयडालॉजीच्या बाबतीत तुमची इयत्ता कंची?, असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार आशिष शेलार यांचे ट्विट
बहुरुपी आले रे.. बहुरुपी आले!.. प्रभू श्रीराम काल्पनिक मानणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेचे वाटेकरी झाले..भारत तेरे तुकडे हो हजार…म्हणणाऱ्यांचे पाठीराखे झाले देव न मानणाऱ्या स्टॅलिन सोबत गेले याकूबची कबर सजवलीच… आणि मराठी मुस्लिमांसोबत बिर्याणीच्या “पंगतीत” जाऊन बसले हिंदुत्वाला तिलांजली देऊन हल्ली हल्ली तर उबाठा नामक गट “समाजवादी” झाले मार्क्सवादी, माकपा, भाकपा सगळ्या जगभरातील विचारसरणी कवटाळून झाल्या असतील तर..आता महाराष्ट्र उबाठा गटाला
विचारतोय…नेमकी आयडालॉजीच्या बाबतीत तुमची इयत्ता कंची ? ..आयडालॉजी तडीपार आणि रोज गळ्यात नवा हार !!..म्हणून आम्ही महाराष्ट्राला
सांगतोय…!!..सावधान.. सावधान.. सावधान
बहुरुपी आले रे … बहुरुपी आले!