क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Road Sex Racket : देहव्यापाराच्या दलदलीत ढकलणार्‍या ‘माही’ला अटक; दोन पिडित मुलींची सुटका!

Mira Bhayandar Police Busted Sex Racket : व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवून करत होती सौदेबाजी,बालाजी हॉटेलवर धाड टाकून कारवाई

मिरारोड | मिरा-भाईंदरमध्ये एका महिला वेश्यादलालकडून देहव्यापारासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पिडित मुलींची सुटका करत, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर पथकाने मोठे यश मिळवले. ‘माही’ नावाने ओळखली जाणारी ही महिला दलाल, मोबाईलवरून ग्राहकांशी संपर्क साधून, व्हॉट्सअ‍ॅपवर मुलींचे फोटो पाठवत असे आणि पैसे घेऊन त्यांचं वेश्याव्यवसायासाठी शोषण करत होती.

काय घडलं होतं नेमकं?

गोपनीय बातमी मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बनावट ग्राहक आणि पंचांची उपस्थितीमध्ये सापळा रचला. ‘माही’ हिने सांगितल्याप्रमाणे, बालाजी हॉटेल, ग्रीन अ‍ॅव्हेन्यू बिल्डिंग, ओम शांती चौक, मिरारोड पूर्व या ठिकाणी ग्राहकांना मुली उपलब्ध करून देण्यात आल्या.

दुपारच्या दरम्यान छापा टाकण्यात आला असता, खुशी ऊर्फ माही अरविंद रागोर (वय 27) हिने दोन पिडित मुलींना वेश्याव्यवसायासाठी पाठवल्याचे निष्पन्न झाले. सौद्याच्या बदल्यात तिने पंधरा हजार रोख रक्कम स्वीकारली होती.

छाप्यातून दोन पिडित मुलींना ताब्यात घेऊन त्यांना रेस्क्यू फाउंडेशन, कांदिवली (प.) येथे संरक्षणासाठी ठेवण्यात आले.

अटक करण्यात आलेली महिला

खुशी ऊर्फ माही अरविंद रागोर
(रा. हाटकेश, मिरारोड पूर्व; मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश)

या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(3) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील, अनिल पवार, रामचंद्र पाटील, सहाय्यक फौजदार राजाराम आसवले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे,पोलीस शिपाई तृषा कटकथोड (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर)
महिला पोलीस शिपाई जयंती वसावे (गुन्हे शाखा प्रशासन) या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0