क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Robbery News : बुरखा घालून टाकला परफेक्ट तिघांचा दरोडा ; दूध व्यापाराचे दहा लाख रुपये लंपास, प्लास्टिक बंदुकीचा धाक!

Mira Road Robbery News : मिरा रोड परिसरात काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हा उघडकीस काशिगांव गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश

मिरा रोड :- अलीकडेच मिरा रोड Mira Road परिसरातील काशिगाव पोलीस Kashigaon Police Station ठाण्याच्या हद्दीत एक जबरी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. काशिगाव पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीने दुधाचा व्यापार असलेल्या व्यापाराच्या घरात पहाटेच्या दरम्यान बुरखा परिधान करून दरोडा टाकला नकली बंदुकीचा धाक दाखवत घरातील दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीला अनेक महिला आरोपींना अटक केली आहे. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद आदिल इलियास अहमद, (रा. काशिगांव मिरा रोड ) यांनी समक्ष काशिगाव पोलीस स्टेशनला हजर राहून तक्रार दिली की, दिनांक 30 सप्टेंबर च्या पहाटे रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी यांचा मोठा भाऊ इप्तिहार इलियास अहमद व लहान भाऊ अतिक अहमद हे नेहमी प्रमाणे त्यांच्या व्यवसायातील दुधाच्या गाड्या खाली करण्या करीता निलकमल नाका, काशिमिरा येथे गेले होते. फिर्यादी आदिल इलियास अहमद व त्यांची पत्नी हे घरात झोपलेले असतांना कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी त्यांचा दरवाजा ठोठावला असता फिर्यादी यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडला असता अचानक त्यांच्या घरामध्ये काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेले दोन अनोळखी इसम व एक बुरखा परिधान केलेली अनोळखी महिला असे घरात घुसले व फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण व दमदाटी केली व त्यातील एका बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडे असलेली प्लॅस्टीकची बंदूक फिर्यादी यांना दाखवून त्यांना खाली जमीनीवर पाडुन फ्लॅस्टीकची बंदुक फिर्यादी यांच्या तोंडात कोंबुन त्यांना मारहाण केली व यातील एका बुरखा परिधान केलेल्या घरात बेडरुम मध्ये फिर्यादी यांच्या व्यवसायातील रोख रक्कम घेतली त्यानंतर ते तिघेही अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण व दमदाटी करुण ते त्या ठिकाणाहून पळून गेले. घडलेल्या प्रकारा बद्दल फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन काशिगाव पोलीस बि.एन.एस ॲक्ट 309 (6),605,352,351,61 (2) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. Mira Road Latest Crime News

काशिगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे बारकावे तपासून व घटनास्थळी तीन अनोळखी व्यक्तीने बुरखा परिधान करुण चोरी करुण ऑटो रिक्षा मध्ये बसुन जात असतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आले. घटनास्थळाचे तसेच आजूबाजूचे व आरोपी येण्या-जाण्याच्या मार्गावरचे असे 20 पेक्षा जास्त ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुण आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हुंदाई कंपनीची वेरणा कारचा नंबर निष्पन्न केला होता.त्या आधारे आरोपींचा शोध घेवून नमुद अटक करण्यात आले होते.अटक आरोपी हे फिर्यादी यांचे नातेवाईक असुन यांतील आरोपी कामरान शेख याने यापुर्वी फिर्यादी व त्यांच्या भावांच्या दुधाच्या व्यवसायात त्यांच्या सोबत काम केले असुन त्याला फिर्यादी यांच्या घरात रोज व्यवसायातील रोख रक्कम ठेवली असल्याची माहीती असल्याने त्याने गुन्ह्याच कट रचुन त्यांनी नमुद गुन्हा संगणमताने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Mira Road Latest Crime News

गुन्ह्यातील आरोपींची नावे

1.जुबेर फरखान शेख, (21 वय रा.स्टार बिल्डींग,बुरहाण चौक, नालासोपारा पश्चिम, पालघर )

2.कामरान इसहाक शेख, (19 वय , पत्ता-स्टार बिल्डींग, बुरहाण चौक, नालासोपारा पश्चिम)

3.महिला आरोपी

अटक आरोपी हे 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बगडाणे, अभिजीत लांडे हे पुढील तपास करत आहे.

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01 डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिगांव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगांव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0