Mira Road News : मिरारोडमधील “दि कन्टेनर किचन”या हुक्का पार्लर चालकासह वेटरवर गुन्हा दाखल

Mira Road Police Raid On Hukkah Parlour : हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
मिरा रोड :- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांनी दि कन्टेनर किचन, (रॉयल कॉलेज समोर, लश लॉनचे बाजुला, मिरारोड पुर्व) बेकायदा हुक्का पार्लरवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा मारण्यात आला. Mira Road Police Raid On Hukkah Parlour या कारवाईत पोलिसांनी पार्लरच्या मॅनेजर, कॅशीयर आणि वेटरला ताब्यात घेतले आहे.
दि कन्टेनर किचन (रॉयल कॉलेज समोर, लश लॉनचे बाजुला, मिरारोड पुर्व )बेकायदा हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध,मीरा-भाईंदर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे किचनवर छापा मारण्यात आला.यावेळी काही ग्राहक हुक्का ओढत बसले होते. त्यामुळे पोलिसांनी लाऊंजचा मॅनेजर साहेब सलीन खान (27 वय ), कॅशीयर अरहान शाहबुद्दीन खान (23 वय), व वेटर आरीफ नसरुद्दीन आलम (21 वय) तोहीद तस्लीम अन्सारी (20 वय),रहिम अली हुसेन (22 वय) मनीष सुखबिर रॉय (30 वय) विरोधात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले.आरोपी विरुध्द व पाहिजे आरोपी हुक्का पार्लरचे चालक, मालक यांचेविरुध्द महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमिरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 287, 3(5) सह सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने यांचा व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि त्यांचे उत्पादन, पुरवठा व वितरण यावर निर्बंध अधिनियम 2003 चे कलम 4 (क), 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, उमेश पाटील, सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील,राजाराम आसावले,शिवाजी पाटील, पोलीस हवालदार चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे यांनी केली आहे.