40 एकर जमीन घोटाळा: मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक! – सहा तास कसून चौकशीनंतर पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई

Sheetal Tejwani finally arrested in Mundhwa land scam : पार्थ पवारांच्या ‘अमेडिया’ कंपनीसाठी झालेला 300 कोटींचा वादग्रस्त व्यवहार; भागीदार दिग्विजय पाटील यांनाही पोलिसांची नोटीस
पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात पुणे पोलिसांनी Pune Police मोठी कारवाई केली आहे. या वादग्रस्त व्यवहारात कुलमुखत्यारधारक (पॉवर ऑफ ॲटर्नी धारक) असलेल्या शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने Pune Crime Branch बुधवारी अटक केली आहे. Pune Latest Breaking News
पोलिसांनी या प्रकरणात विविध शासकीय विभागांकडून कागदपत्रे मिळवून तपास केला. तेजवानी हिने यापूर्वी 20 नोव्हेंबर रोजी सलग सहा तास चौकशीला सामोरे गेली होती. मात्र, तपासात तिचा थेट सहभाग असल्याचे आणि शासकीय जमीन खासगी कंपनीच्या नावावर करण्यासाठी तिने खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले.
प्रकरणातील महत्त्वाचे तपशील
संबंधित जमीन ‘महार वतना’ची असून, 2006 मध्ये शीतल तेजवानीने 275 व्यक्तींकडून कुलमुख्यारपत्रे करून घेतली होती. त्यानंतर 2025 मध्ये तिने ‘अमेडिया’ कंपनीबरोबर करार करून ही जमीन त्यांना विकली. 40 एकर जमिनीचा हा व्यवहार सुमारे 300 कोटी रुपयांत करण्यात आला होता. या व्यवहारात माहिती-तंत्रज्ञान पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र मिळवून मुद्रांक शुल्कात 21 कोटी रुपयांची सवलत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे, परंतु ते अद्याप जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेले नाहीत. पोलिसांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह विविध कार्यालयांमधून कागदपत्रे जप्त केली असून, या घोटाळ्याचा सखोल तपास सुरू आहे.



