क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Drugs News : गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश ; दोन किलो गांजा जप्त, तीन आरोपीला अटक

Mira Road Police Arrested Drug Seller : गांजाची विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना पोलिसांना केला अटक, दोन किलो गांजा जप्त

मिरा रोड :- लोकसभेच्या मुंबई ठाणे पालघर आधी लोकसभा Mumbai Lok Sabha Election क्षेत्रात 20 मे ला मतदान होणार आहे तत्पूर्वी राजकीय प्रचाराच्या ताफाचा रंग चढत असताना पोलिसांकडूनही खबरदारी म्हणून राज्यात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे. मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी यशस्वी कामगिरी करत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास दोन किलो Ganja caught गांजा जप्त केला आहे.

03 मे 2024 रोजी रात्री 08.00 सुमारास काशिगाव पोलीस ठाण्याच्या Kashigaon Police Station हद्दीत ब्रँड फॅक्टरी जवळ एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रकाश विक्रम जाधव 54 वर्ष त्याला ताब्यात घेतले असता पोलिसांनी त्याच्याकडून 23 हजार 300 रुपयांचा एक किलो चाळीस ग्रॅम वजना अंमली पदार्थ जप्त केला होता.

8 मे 2024 रोजी रात्रीच्या 03.00 वाजले च्या सुमारास काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांच्या अधिकारी व अंमलदार येथे राऊंड अप करताना दोन संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या डंपरच्या पाठीमागे जाऊन लपले पोलिसांना आलेल्या संशयावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांचे चौकशी केली असता त्यांच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले त्यांच्याकडून पोलिसांनी 23 हजार 500 रुपयांचा एक किलो 24 ग्रॅम वजनाचा गांजा आमले पदार्थ जप्त केला होता. पोलिसांनी आरोपीचे चौकशी केली असता आरोपीने हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. तसेच हा गांजा राजकोट आणि गुजरात येथून विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपीने सांगितले आहे. अटक करणाऱ्या आरोपींचे नाव राजन वसंतराव पटेल (23 वर्ष), सागर जीवनभाई वगासिया (24‌ वर्ष) असे दोन आरोपींना अटक केली आहे. Mira Road Drugs News

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विजय मराठे यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील मार्गदर्शनाखाली काशिगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन किलो ६४ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्याची किंमत 46 हजार 600 रुपये अशी असून आरोपींवर एनडीपीएस पहिल्यांदा कारवाई करण्यात येत आहे. Mira Road Drugs News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0