Mira Road Cyber Fraud : ऑनलाईन फसवणुकीतील 100 टक्के रक्कम वाचवण्यात सायबर पोलिसांना यश
Mira Road Credit Card Fraud News: क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवणूक झालेली सात लाख रुपयांची रक्कम सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या मूळ खात्यावर परत
मिरा रोड :- क्रेडिट कार्ड फसवणुकीतील Credit Card Fraud 100% रक्कम परत मिळून देण्यास सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील मिरा रोड परिसरात राहणाऱ्या शिंदे यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्ड अपडेट संदर्भात मेसेज द्वारे लिंक प्राप्त झाली होती. अपडेटच्या नावाखाली फसवणुकीमध्ये शिंदे यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून जवळपास सात लाख रुपये कट झाल्याचे मेसेज त्यांना प्राप्त झाले होते. Mira Road Crime News
शिंदे यांनी ताबडतोब मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाशी संपर्क साधला घडलेल्या प्रकरणाबाबत सायबर विभागाला तक्रार दाखल केली होती. तक्रारदार शिंदे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हणाले आहे की, क्रेडिट कार्ड अपडेट करण्याकरिता मोबाईलवर मेसेज द्वारे लिंक प्राप्त झाली होती. लिंक ओपन केली असता एक अनोळखी ॲप डाऊनलोड झाले आणि त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून सहा लाख 99 हजार 999 रुपये कट झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. सायबर विभागाने शिंदे यांच्या तक्रारीनुसार ताबडतोब खात्यांची पाहणी करून त्यांचे कट झालेली रक्कम रिलायन्स बीपी पेमेंट गेटवे च्या माध्यमातून पुढे वळती केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ताबडतोब पत्रव्यवहार करून ती रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर शिंदे यांच्या मूळ खात्यावर सहा लाख 99 हजार 999 रुपये परत मिळवून दिले आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, शुभम कांबळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News